Labels

Wednesday 24 June 2020

चाय गरम , 'चिनी' कम!

मे-जून २०२० मध्ये भारत-चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घडलेल्या काही घटनांमुळे, पंगाँग-त्सो, दौलत बेग ओल्डी, गलवान खोरे, श्योक नदी, अशी काही नावे अचानकच चर्चेत आली. यांपैकी बहुतेक भागांमध्ये सामान्य पर्यटकांना जायला बंदीच आहे. लडाखमध्ये पर्यटनासाठी गेलेले लोक पंगाँग-त्सो तळे ("थ्री इडियट्स" सिनेमातले) नक्की पाहतात! १९६२च्या युद्धासंबंधी ज्यांनी वाचले-ऐकले असेल अशांना नथू-ला, चुशूल ही नावेदेखील ऐकून माहीत असतील. मी आर्मी ऑफिसर असल्यामुळे, कामानिमित्त आणि पर्यटनानिमित्तही यापैकी काही भागांमध्ये वावरण्याची संधी मला मिळाली होती. तेंव्हाचे दोन-तीन प्रसंग यानिमित्ताने सहजच आठवले.

Saturday 13 June 2020

'बद्धपरिकर'

संस्कृत भाषेतला एक शब्द कधीतरी ऐकला होता. 'बद्धपरिकर'. सदैव तयार, सज्ज किंवा सिद्ध असण्याच्या अवस्थेसाठी योजलेला बद्धपरिकर हा शब्द सैन्यदलाला एकदम फिट बसतो. कारण, अंगावर पडेल ते काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी सैन्यदलाचे जवान व अधिकारी सदैव सज्ज असतात. आपत्ती निवारण, अतिरेक्यांचा नायनाट, दंगे-धोपे आटोक्यात आणणे, किंवा अगदी बोअरवेलमध्ये पडलेल्या लहान मुलाला वाचविण्याच्या कामीदेखील सैन्यदलाला पाचारण केले जाते, आणि ते-ते काम फत्ते होणारच असा गाढ विश्वास आम जनतेला वाटतो.

Tuesday 2 June 2020

लाख छुपाओ, छुप ना सकेगा...

आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित सैनिकी प्रशिक्षण संस्थेत, म्हणजेच NDAमध्ये ट्रेनिंग घेणे ही खरोखर एक पर्वणीच होती. 'सुदान ब्लॉक' ही NDAची मुख्य इमारत, एखाद्या राजवाड्यासारखी अतिशय  देखणी वास्तू आहे. स्वच्छ, चकचकीत रस्ते, विस्तीर्ण  परेड ग्राउंड, विविध खेळांची व पीटीची मैदाने, जिम्नेशियम हॉल, पोहण्याचे तलाव, आधुनिक उपकरणांनी युक्त, प्रशस्त 'कॅडेट्स मेस', स्क्वाड्रन्सच्या  रेखीव, दगडी वास्तू, असा डोळ्यांचे पारणे फेडणारा, NDAचा हिरवागार परिसर सात हजार एकर जमिनीवर पसरलेला आहे.