'आर्मी' हा शब्द उच्चारताक्षणी, 'शिस्त' हा शब्द मनात येतोच. प्रत्येक काम, नेमून दिलेल्या पद्धतीने, शिस्तीत करणे, ठराविक ढंगाने वागणे-बोलणे, या गोष्टींमुळे सैन्यदलातला माणूस, एखाद्याच्या चाणाक्ष नजरेला बरोबर टिपता येतो. अगदी सेवेतून निवृत्त झाल्यावरदेखील 'जित्याची खोड' काही जात नाही.
दोन वेगवेगळ्या प्रसंगी, एकदा पुण्याच्या हेड पोस्ट ऑफिसात आणि एकदा महाराष्ट्र राज्य सरकारच्या एका कार्यालयात, अशा दोन कर्मचाऱ्यांचे अगदी लक्षात राहण्यासारखे अनुभव मला आले. मी निवृत्त सेनाधिकारी आहे हे त्यांना माहीत नव्हते. पण, त्या दोघांनीही अगदी चाकोरीबाहेर जाऊन मला मदत केली होती. उत्स्फूर्तपणे मदत करण्याची त्यांची वृत्ती व त्यांची कार्यनिष्ठा पाहून, आणि त्यांच्या एकंदर कार्यपद्धतीचे निरीक्षण केल्यावर मी त्यांना विचारले, "तुम्ही माजी सैनिक आहात ना?"
सैन्यदलात १५ वर्षे सर्व्हिस झाल्यावर काही सैनिक निवृत्ती स्वीकारतात आणि त्यातले काही माजी सैनिक, केंद्र अथवा राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये नोकरीवर रुजू होतात हे मला ठाऊक होते. हे दोघे कर्मचारी त्यापैकीच असावेत असा अंदाज मी बांधला होता. ते दोघे खरोखरच माजी सैनिक होते आणि माझ्या प्रश्नाने अतिशय चकित झाले होते. मग मी स्वतःचा परिचय दिला आणि त्यांचे कौतुक केले. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळेच मी त्यांना ओळखल्याचे सांगितल्यावर, अभिमानाने त्यांची छाती फुललेली मला दिसली !
माझ्या सर्व्हिसमध्ये, फौजी जवानांच्या कर्तव्यदक्षतेचे अनेक अनुभव जसे मला आले, तसेच, ठराविक पद्धतीनेच काम करण्याच्या 'फौजी खाक्या' मुळे घडलेले काही विनोदी प्रसंगही आठवतात.
१९९६ ते १९९८ या काळात, मी पुण्यातल्या सिग्नल रेजिमेंटमध्ये पोस्टिंगवर असतानाचा एक प्रसंग. माझ्या कार्यालयीन कामाव्यतिरिक्त, 'मेस सेक्रेटरी' या नात्याने, ऑफिसर मेसच्या व्यवस्थापनाचे काम माझ्याकडे होते. तसेच, सर्व वाढदिवसांची भेटकार्डे व पुष्पगुच्छ घरोघरी पाठवण्याची जबाबदारीही माझ्यावरच होती. 'मोबाईल' नावाच्या जादुई यंत्राचा प्रवेश भारतीयांच्या आयुष्यात तोपर्यंत झालेला नव्हता. कॉम्प्युटर व प्रिंटरचा वापरही मर्यादितच होता. एखाद्या मंगल प्रसंगी, समयोचित अशा भेटकार्डावर हाताने मजकूर लिहून पाठवण्याची पद्धत सगळीकडेच होती. आकर्षक, कलात्मक अक्षरात तो मजकूर लिहिण्यासाठी युनिटमधल्या 'ड्राफ्ट्समन' च्या हस्तकलेचा आम्हाला खूपच उपयोग होई.
ही नेमून दिलेली पद्धत एखाद्या well-oiled मशीनप्रमाणे काम करीत होती याचा प्रत्यय मला लवकरच आणि अगदी प्रकर्षाने आला. १ डिसेंबर १९९६ च्या संध्याकाळी माझ्या दारावरची बेल वाजली. आलेल्या जवानाने कडक सॅल्यूट ठोकून, चार कार्डे आणि ते वाढदिवसांचे कॅलेंडर माझ्या हातात ठेवले,
"सर, एक कार्ड सिलेक्ट करने के लिये 'ड्राफ्ट्समन' ने आपके पास भेजा है।"
हे ऐकून मात्र, हसावे की रडावे तेच मला कळेना. दुसऱ्या दिवशी ज्या दांपत्याच्या लग्नाचा वाढदिवस होता त्यांची नावे होती - 'डॉ. सौ. स्वाती आणि मेजर आनंद बापट'!
ठरलेल्या पद्धतीप्रमाणे, मेस सेक्रेटरीने कार्ड निवडायचे, कच्चा मजकूर द्यायचा आणि आपण तो कार्डावर सुबकपणे लिहायचा एवढाच ठोकळेबाज विचार त्या 'ड्राफ्ट्समन'ने केला असणार. मेस सेक्रेटरीच्याच लग्नाचा वाढदिवस आहे हे त्याच्या ध्यानीमनीही नसावे!
मी तरी काय करणार? त्या चार कार्डांपैकी एक कार्ड मी निवडले आणि कार्डासाठी मजकूरही लिहून दिला.
युनिटतर्फे आम्हाला पाठवले गेलेले (?) तेच कार्ड आणि एक छानसा पुष्पगुच्छ घेऊन, २ डिसेंबरच्या पहाटे एक जवान आमच्या दारात उभा होता. दोन्ही गोष्टी मी आनंदाने स्वीकारल्या आणि त्याला अगदी तोंडभरून धन्यवादही दिले! सगळेच फौजी आमच्या त्या 'ड्राफ्ट्समन'सारखे नसतात, पण काही-काही नमुने मात्र अक्षरशः 'लकीर के फकीर' असतात हे मला मान्य केलेच पाहिजे!
फौजी माणसाच्या ठराविक लकबी, बोलण्याची विशिष्ट ढब आणि काही टिपिकल शब्दप्रयोगांमुळे, अनेकदा ते लोकांच्या चेष्टेचा विषयही ठरतात. स्वाती आणि आमची मुले माझीदेखील मनसोक्त चेष्टा करतात. त्यांच्या मते, "फौजी माणसाच्या डोक्यात नवीन कल्पना पेरण्यापेक्षा अवघड अशी फक्त एकच गोष्ट असते. ती म्हणजे, त्याचे आधीचे समज आणि जुनी कार्यपद्धती त्याच्या डोक्यातून उपटून काढणे!"
फौजी वागण्या-बोलण्याचा एक वेगळाच अनुभव, डिसेंबर १९७५ मध्ये, म्हणजे मी स्वतः सैन्यात जाण्यापूर्वीच, मला आला होता. मी त्यावेळी सातारच्या सैनिक शाळेत दहावीत शिकत होतो आणि NCC कॅडेटही होतो. जानेवारी १९७६ मध्ये दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी, मी आणि माझा वर्गमित्र, (आता निवृत्त कर्नल) महेश कुलकर्णी, अशा दोघांची महाराष्ट्राच्या NCC संघात निवड झाली होती. दिल्लीला जाण्यापूर्वीच्या कॅम्पसाठी मला व महेशला पुण्याला जायचे होते. आम्हा दोघांना सातारच्या रेल्वे स्टेशनवर पुण्याच्या गाडीत बसवून देण्याची जबाबदारी, आमच्या NCC युनिटमध्ये प्रशिक्षक असलेल्या, 'मराठा लाईट इन्फन्ट्री' च्या एका हवालदारावर होती.
आम्ही सामानासह डब्यात बसल्यावर तो हवालदार निघून गेला असता तरी चालले असते. परंतु, गाडी सुटेपर्यंत आमच्यासोबतच राहण्याचे आणि प्रवासाकरिता आम्हाला खबरदारीच्या सूचना देण्याचे काम त्याला नेमून दिले गेले असावे. त्यामुळे, मिलिट्रीत आदेश देताना काढतात तसला ठराविक करडा आवाज लावून, आणि भावनाशून्य पण कर्तव्यदक्ष, अशा मिश्र ढंगाने तो आम्हाला त्या सर्व सूचना एकापाठोपाठ एक देऊ लागला.
साधारणपणे, वयाच्या सोळाव्या वर्षी फुटतात तितपत शिंगे, मला आणि महेशला फुटलेली होती. त्यामुळेच, त्या हवालदाराचे भाषण ऐकताना आम्ही जाम बोअर झालो होतो. तो स्वतः आणि आम्ही दोघे मुलेही मराठी-भाषिक असूनदेखील, तो त्या सर्व सूचना त्याच्या मराठमोळ्या फौजी हिंदीमध्ये देत होता. साळसूद चेहरा ठेवून पण, "काय कटकट आहे?" असे मनातल्या मनात म्हणत आम्ही ऐकत होतो. अचानक, त्याची एक सूचना ऐकून आम्ही दोघेही खो-खो हसू लागलो. तो म्हणाला होता, "रास्ते में किसी स्टेशनपर पानी पीना है तो दोनोंमें से सिर्फ एक आदमी उतरेगा और दूसरा आदमी सामान को गार्ड करेगा। दोनों आदमी अगर एकसाथ उतरेंगे, तो कोई चोर आएगा और आप का सामान लेके मार्च करेगा।"
त्याचे ते "मार्च करेगा" हे शब्द ऐकून माझ्या आणि महेशच्याही डोळ्यासमोर, चोरलेल्या मुद्देमालासहित 'लेफ्ट-राईट' करीत निघालेला चोर दिसू लागला. न राहवून, हसत-हसतच मी त्याला म्हणालो, "साब, चोरी करनेके बाद चोर मार्चिंग क्यूँ करेगा? वो तो जोर से भाग जायेगा!"
आम्ही त्याची चेष्टा करतोय हे ओळखून तो हवालदार चिडला अणि तडक तेथून निघाला. तो गेला असे समजून आम्ही सुटकेचा निश्वास सोडून हसत असतानाच तो अचानक परत आला. एका बाटलीत त्याने नळावरून पिण्याचे पाणी भरून आणले होते. ती बाटली आणि चार केळी आमच्या हातात ठेवून, "किसीभी कारण से गाडीसे उतरना नहीं। अपना खयाल रखना।" अशी शेवटची सूचना तो आम्हाला बजावत असतानाच गाडी हलली. खरे तर त्याच्या बोलण्याची आम्ही आधी चेष्टाच केली होती. पण तशा परिस्थितीतदेखील त्याने दाखवलेला संयम आणि त्याची कर्तव्यनिष्ठा आम्हाला जाणवली. मग मात्र आम्ही दोघेही चांगलेच ओशाळलो होतो.
आज इतक्या वर्षांनंतरही, रांगड्या बोलीत बोलणारा तो कर्तव्यदक्ष हवालदार मला प्रकर्षाने आठवतो. माझ्या सुदैवाने, वरकरणी 'खाकी डोक्याच्या', परंतु अतिशय निष्ठावान अशा, अनेक जवानांसोबत घालवलेली आयुष्याची महत्वाची २६ वर्षे, मला खूप काही देऊन गेली आहेत!
Anand! How well you seem to capture these small yet unique features of Army life and community! Those 40 yrs, including training at NDA & IMA have, indeed, given me a wealth of happy-sad... bitter-sweet memories...enough to last this lifetime & vivid enough to go back to in times of stress/ ennui or immediately after brought to the fore by your literary eloquence! Thanks for keeping these memories alive.
ReplyDeleteThanks JN!
DeleteSometimes, we indeed miss those days, as well as the simple souls we served with!
Very well written
ReplyDeleteThanks, Ravi! 🙏
DeleteTiny things that made all the difference penned down so beautifully
ReplyDeleteThanks, Kshipra!
DeleteSure, we all do miss those wonderful days and the unit life!
Dear Anand , u have an eye for funny details/observations and the skill to narrate it / write it in a very interesting manner , that is very nice . I am generally cautious in my behaviour in ur company so that I am not a subject of ur funny stories . In this story u have included me as ur partner in the NCC episode which I enjoyed it as a replay after several decades however if I am going to be the funny character of ur next such episode then plz get the draft approved from me 😃Col Mahesh
ReplyDeleteधन्यवाद!
ReplyDeleteतुझं नाव कळेल का?
वाटल्यास ९४२२८७०२९४ वर कळव. 🙂
This comment has been removed by the author.
ReplyDeleteWell said. My salute to the Faujis. 🙂🙏
ReplyDelete🙂Thanks!
Deleteकर्नल, thanks for sharing memories! Suhas Apte, RPH 472, '74 Pass out.
ReplyDelete😃🙏
DeleteGood eve sir. Very nicely written. Your language and style of describing a fact is excellent.your dedication to core is noteworthy sir. Thanks for sharing
ReplyDeleteYou have a way of narrating humorous incidents Colonel. �� Looking forward to more 'Humourin Uniform'.
ReplyDeleteMilind Ranade
🙂🙏
DeleteDear Anand Excellent capture of your Memoirs in very lucid style. Very well articulated. The Army is a well knit family and every moment is worth cherishing. I have enjoyed my 35 years plus and your narrative reminds me of some great experiences. Well done. Good pictures Warm Regards. Brig Ajit Apte(Retd) 37th NDA J Squadron
ReplyDeleteThank you, sir! 🙂
DeleteVery well narrated Anand: AG Shinde, KH 527
ReplyDeleteThanks AG! 🙏
DeleteDo also read my previous posts on this blog as well as on the other Blog called colbapat.blogspot.com
Good one!! :)
ReplyDeleteThanks! Is this Om Joshi?
Deleteसर्व प्रसंग अगदी डोळ्यासमोर घडत असल्यासारखे वाटलं. आनंद तुला जसा तुझ्या सहकार्याचा अभिमान वाटतो तसाच मलाही तू मित्र असल्याचा खूप गर्व आहे.
ReplyDeleteप्रत्यक्ष भेटून गप्पा मारणे शक्य होत नाही. पण वाचून गप्पा मारल्याचा आनंद नक्कीच मिळतो.
Many thanks!🙂🙏
Deleteप्रिय आनंदजी,
ReplyDeleteसुरेख शब्दचित्र,प्रत्यक्ष प्रसंग समोर उभा करण्याची हातोटी आपल्या कडे आहे.असेच आणखीअनुभव वाचायला नक्कीच आवडेल. आपल्यालेखन प्रवासास खुप शुभेच्छा.
मकरंद मोघे.
Very well written anecdotes Anand ! As always, interesting and engrossing to read. Miss all those simple souls.
ReplyDeleteWe all miss our fauji days,whether good or bad.. goo one Anand.. Col Mukund Pandit
ReplyDeleteVery true.
DeleteThank you, sir! 🙂
As I have said earlier, my birthday in 2002 was a special one, thanks to you! 🙏
छानच
ReplyDeleteधन्यवाद! 🙂🙏
DeleteWah ! खूप छान as usual ,army तला हा human point विशेष माहिती नव्हता... किती सुंदर पद्धतीने आणि खास army style relations maintain करता तुम्ही ...तुमची anniv खरच अविस्मरणीय झाली....
ReplyDelete🙂
Deleteधन्यवाद! 🙏
Good
ReplyDeleteछान असे शब्दचित्र नजरे समोर उभे केले, तुमचे लेखन वाचुन आनंद होतो
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteही कथा रम्य आहे.शिस्तशिर पणात असाही सुखद विनोद घडू शकतो.
ReplyDelete😁 असेही घडते.
Delete