सैन्यदलातील नोकरी म्हणजे सतत मृत्यूच्या सावटाखाली जगणे असाच समज पुष्कळ लोकांचा असतो. तो समज काही अंशी खराही आहे. NDA प्रशिक्षणकाळापासूनचे माझे स्वतःचे काही मित्र मी अकाली गमावले आहेत, कोणी युद्धभूमीवर, तर कुणी अतिरेक्यांच्या घातपातात! त्यातला एक तर अगदी सैनिक शाळेत पाचवीपासून माझ्याबरोबर असलेला...
त्या मित्रांची आठवण आली की आजही हृदयात एक अनामिक कळ येऊन जाते.
सैन्यदलातील माझी ब्रँच ही संपर्क यंत्रणेशी संबंधित असल्याने प्रत्यक्ष युद्धसदृश प्रसंग माझ्या आयुष्यात कमीच येणार होते. तरीही कारगिल युद्धाच्या वेळी मी पुण्याहून जम्मू-काश्मीरमधील अखनूर भागात असलेल्या माझ्या युनिटमध्ये जायला निघालो होतो तेंव्हा आईच्या डोळ्यांतील काळजीयुक्त भीती मला दिसली होती.
एक प्रसंग १९८५ सालचा आहे. मी पुण्यात दापोडी येथे असलेल्या CME, म्हणजे सैन्य इंजिनियरिंग कॉलेजमध्ये BTechच्या अभ्यासक्रमात शिकत होतो. सैन्यदलात कमिशन घेऊन चार वर्षे झाली होती आणि 'कॅप्टन' या हुद्दयावर होतो. अजून अविवाहित असल्याने CMEच्या होस्टेलवर राहत असलो तरी आई-वडील पुण्यातच असल्याने घरी येणे-जाणे वरचेवर होत असे. स्वतःच्या येझदी मोटरसायकलवर मित्र-मैत्रिणींसोबत भटकंतीही असायचीच.
असाच एका संध्याकाळी घरी गेलो होतो. रात्री जेवून होस्टेलवर जायला निघालो तेंव्हा "जपून जा रे" हे शब्द कानात साठवूनच निघालो. मुलं कितीही मोठी झाली तरी आई-वडील काळजी आणि मायेपोटी हे शब्द बोलतातच!
त्या काळी, रात्री ११च्या सुमारास पुणे-मुंबई रस्त्यावर जेवढी असायची तेवढी म्हणजे, आजच्या मानाने खूपच कमी रहदारी होती. परंतु, रस्ताही आज आहे तेवढा रुंद नव्हता. CMEच्या हददीलगत मुळा नदीवर जुना हॅरिस पूल होता. एका वेळी दोन ट्रक एकमेकांना क्रॉस करू शकतील इतपतच त्याची त्यावेळची रुंदी होती. पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी कठडे होते.
मी पुलावर आलो तेंव्हा रस्ता अक्षरशः रिकामा होता. जेमतेम पुलाच्या मध्यापर्यंत मी आलो असेन, तोच समोरून एक ट्रक वेगात येताना दिसला. अर्थात, मला काहीच धोका नव्हता. तरीही, सावधगिरी म्हणून रस्त्याच्या डाव्या बाजूच्या कठड्याजवळून माझी गाडी चालवत मी पुढे निघालो.
पुढच्याच क्षणी माझ्या काळजाचा ठोका चुकला. कारण, आता समोर दोन नव्हे, तर चार हेडलाईट दिसू लागले. वेगाने येणाऱ्या पहिल्या ट्रकबरोबर स्पर्धा करीत दुसरा एक ट्रक पुलावर चढला होता. पिसाट वेगाने येणाऱ्या त्या दोन्ही ट्रक्सनी संपूर्ण रस्ता व्यापला होता. आधीच रस्त्याच्या अगदी डावीकडे आलो असलो तरीही, ओव्हरटेक करणारा ट्रक मला उडवणार हे मला त्या एका क्षणात स्पष्ट दिसू लागले.
संकटकाळी प्रसंगावधान राखण्याची कला, NDA पासूनच्या सैनिकी प्रशिक्षणामध्ये आमच्या रक्तातच भिनवली गेली असावी!
मी माझी बाईक थांबवून कठड्याला टेकवली आणि दोन्ही हातांनी कठडा पकडला. डावा पाय कठड्यावर आणि उजवा पाय उचलून बाईकच्या हँडलवर ठेवला आणि जेमतेम बाईकवर बूड टेकवून स्थिर झालो.
आता ट्रकने उडवल्यास बाईक बुडाखालून निघून गेली असती पण मी कठडा धरून राहिलो असतो. अगदीच जोराचा धक्का बसला असता तरी, फार तर पुलाखाली मुळा नदीच्या पाण्यात पडलो असतो. पण ट्रकच्या चाकाखाली चिरडले जाण्याची शक्यता कमी झाली होती.
लहानपणी, श्री. द. पां. खांबेटेंच्या गूढ-विज्ञानकथेत किंवा श्री. नारायण धारपांच्या भयकथेत एक वाक्य वाचलेलं आठवतंय...
"आणि क्षणार्धात 'ते' घडलं ..."
उजवीकडच्या दोन्ही चाकांच्या रिम कव्हर्सनी माझ्या बाईकची दोन्ही फूटरेस्ट काडकाड उडवत, तो ट्रक सुसाट निघून गेला!
कठड्यावर हात आणि बाईकवर बूड पक्कं ठेवलेलं असल्याने बाइकसकट मी संपूर्णपणे हादरलो, इतकंच!
मुख्य म्हणजे मी जिवंत होतो. मोटारसायकलची फूटरेस्ट तुटण्यापलीकडे काहीच नुकसान झालेलं नव्हतं हेही विशेष!
पण त्या एका क्षणात, "आता बहुतेक संपणार सगळं..." हा विचार मनात येऊन गेला होताच.
"जपून जा रे" म्हणणारे लोक त्या काळजीभरल्या वाक्यासोबत आपल्या पुण्याईची शिदोरीही बांधून देत असतात की काय देव जाणे!
What a presence of mind that's why you could open you mind today.
ReplyDelete🙂🙏
DeleteI wish I could know your name.
थरारक अनुभव!काळजाचा ठोका चुकवणारा अविस्मरणीय प्रसंग!!
ReplyDeleteउत्तम निर्णय आणि प्रसंग निन्हवण्याचे धाडस!!
सलाम!!
🙂🙏
DeleteExcellent reflexes and presence of mind
ReplyDeleteThanks. 🙏
DeleteI wish I could know your name.
Sharp reflexes & prsence of mind 🙏
ReplyDelete🙂Thanks, Shailesh!
Deleteअसे प्रसंग जन्मभर लक्षात राहतात . 👏👏👏
ReplyDeleteखरंय. 🙂
ReplyDeleteThanks, Anand!
चित्तथरारक. सैन्यात मिळेल, नाही मिळेल पण असा थरार अनुभवायला न मिळणारा फटफटीचालक विरळाच. प्रसंगावधानाबद्दल कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.
ReplyDelete🙂🙏धन्यवाद!
DeleteOh sir. Very much thrilling experience narrated in soft manner u r great
ReplyDelete🙂🙏Thanks!
Deleteउत्तम प्रसंगावधान
ReplyDelete🙂🙏
DeleteThose days Poona-Bombay Highway was notorious for a very high accident rate...the highest in the country. Your NDA 'chatki' and atheletism saved you! Beautiful & lucid narration, sir!
ReplyDeleteYes. Thanks JN! 🙏
DeleteOMG!! No words hats off to you
ReplyDelete🙂👍
Deleteग्रेट!
ReplyDelete🙂🙏
DeleteNDAतिल कठोर प्रशिक्षीण यामुळे प्संगावधानाबरोबर अचुक निर्णय घेऊन काळाला परतऊन लावले.खरोखर बोधपर आहे.
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteखरंच ग्रेट आयुष्यात संधी मिळाली तर आपल्याशी बोलता आल तर आनंदच..जवळ पास आपले सर्व लेख वाचतो आहे. जय हिंद
ReplyDelete