Friday, 29 May 2020
Saturday, 23 May 2020
जितना रगडा, उतना तगडा !
NDAमधील कडक ट्रेनिंगबद्दल स्वातीला कमालीचे कुतूहल होते. अधे-मधे तुटक-तुटक माहितीच कानावर आल्याने तिची उत्सुकता अगदीच शिगेला पोहोचली होती. NDAतले पीटी-ड्रिलचे 'उस्ताद' जे वाक्य नेहमी म्हणायचे, ते तिला मी सांगितले होते "जितना रगडा, उतना तगडा!" ते सगळे उस्ताद आम्हाला चांगलेच रगडायचे, हे तिला ऐकून माहिती झाले होते. पण, सिनियर कॅडेट्स नेमके काय स्पेशल ट्रेनिंग देतात त्याचे गूढ अजून उकलायचे होते.
Saturday, 16 May 2020
पति, पत्नी, और 'वोह' !
डिसेंबर १९८७ मधली गोष्ट आहे. त्यावेळी मी कॅप्टन हुद्यावर होतो आणि मध्य प्रदेशात महू येथील मिलिटरी इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये बी.टेक च्या तिसऱ्या वर्षात शिकत होतो. १९८६मध्ये आमचे लग्न झाले तेंव्हा, स्वाती सोलापूरला पोस्टग्रॅज्युएशन करत होती. १९८७च्या जून-जुलैपासून ती महूला माझ्यासोबत प्रथमच राहायला आली होती. तिला सैन्यातील जीवन तसे अजूनही नवीनच होते. मी हळू-हळू तिला एकेका गोष्टीची, सैन्यातील जीवनशैलीची, शिष्टाचारांची ओळख करून देत होतो.
एका निवांत संध्याकाळी, मी आणि स्वाती, ऑफिसर्स क्लबमध्ये गप्पा मारत बसलो होतो. अचानक एक ऑफिसर आमच्यासमोर येऊन उभा राहिला आणि आम्हाला अभिवादन करत अदबीने म्हणाला,
एका निवांत संध्याकाळी, मी आणि स्वाती, ऑफिसर्स क्लबमध्ये गप्पा मारत बसलो होतो. अचानक एक ऑफिसर आमच्यासमोर येऊन उभा राहिला आणि आम्हाला अभिवादन करत अदबीने म्हणाला,
"Good evening ma'm! Good evening sir! सर, मला ओळखलंत ना ?
Sunday, 3 May 2020
लिव्हर सलामत, तो...

Subscribe to:
Posts (Atom)