दीड-एक वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'अंधाधुन' या सिनेमाच्या सुरुवातीलाच एक वाक्य पडद्यावर येतं, "Life depends upon the Liver!" प्रथमतः ते वाक्य आम्हाला अगदीच विचित्र वाटलं होतं. पण सिनेमा पाहिल्यानंतर, आणि त्या वाक्याचा संदर्भ लक्षात घेता, फारच मजा वाटली होती. त्या सिनेमावर मी आणि स्वाती चर्चा करीत असताना, स्वाती पटकन चेष्टेनेच म्हणून गेली, "Life depends upon the Liver!" हे वाक्य तुझ्या आयुष्यालाही लागू पडतं, नाही का?"
मलाही ते पटले आणि माझे मन सहजच भूतकाळात गेले.
आमच्या कुटुंबाचा सैनिकी पेशाशी फारसा संबंध नव्हता. तसा माझ्यापेक्षा वयाने बराच मोठा असलेला एक आतेभाऊ आर्मीमध्ये कर्नल होता. नोकरीनिमित्ताने तो फिरतीवर असल्याने, त्याची आणि माझी कधीतरी ओझरतीच भेट झाली असेल. माझ्या आईच्या वडिलांना, भाऊकाका जोशींना, सैन्यदलांविषयी प्रचंड आकर्षण होते. ते स्वतः एका सिनेमा थिएटरचे मालक होते. परंतु, आपल्या कुटुंबातील कोणीतरी आर्मीमध्ये जावे असे त्यांना फार वाटे. कदाचित त्यामुळेच, माझ्या मामेभावाला कर्नाटकातील विजापूरच्या सैनिक शाळेत घातले गेले असावे.
मलाही ते पटले आणि माझे मन सहजच भूतकाळात गेले.
आमच्या कुटुंबाचा सैनिकी पेशाशी फारसा संबंध नव्हता. तसा माझ्यापेक्षा वयाने बराच मोठा असलेला एक आतेभाऊ आर्मीमध्ये कर्नल होता. नोकरीनिमित्ताने तो फिरतीवर असल्याने, त्याची आणि माझी कधीतरी ओझरतीच भेट झाली असेल. माझ्या आईच्या वडिलांना, भाऊकाका जोशींना, सैन्यदलांविषयी प्रचंड आकर्षण होते. ते स्वतः एका सिनेमा थिएटरचे मालक होते. परंतु, आपल्या कुटुंबातील कोणीतरी आर्मीमध्ये जावे असे त्यांना फार वाटे. कदाचित त्यामुळेच, माझ्या मामेभावाला कर्नाटकातील विजापूरच्या सैनिक शाळेत घातले गेले असावे.
मामेभावाचा खाकी गणवेश, त्याने ऐटीत करून दाखवलेली कवायत, आजोबांनी त्याचे केलेले कौतुक हे सगळे मी हळूच मनात टिपून घेत होतो. त्यामुळे, मी जेमतेम सात-आठ वर्षांचा असतानाच, माझ्या मनात सैन्यजीवनाविषयी आकर्षण निर्माण झाले असावे. आणि म्हणूनच, "तुलाही जायचंय का सैनिक शाळेत?" या प्रश्नाचे उत्तर मी होकारार्थी दिले असावे. हळूहळू मीच म्हणू लागलो, "मला सैनिक शाळेतच जायचंय". अखेर मी सातारच्या सैनिक शाळेच्या प्रवेश परीक्षेला बसलो, उत्तीर्णही झालो आणि १९७० साली त्या शाळेत प्रवेश घेतला.
प्रवेशपरीक्षेतील यशाची धुंदी, आणि 'आपल्याला हवे होते ते' मिळाल्याच्या आनंदाचा बहर, शाळेत दाखल झाल्यानंतर फार काळ टिकला नाही. जेमतेम साडेनऊ वर्षांचा असताना, आपल्या घरापासून, आणि आईवडिलांपासून दूर, निवासी शाळेत राहण्यातले वास्तव तितकेसे सुखावह नाही याची जाणीव पहिल्या दिवशीच झाली. इतर मुलांशी बोलताना हेही लक्षात आले की आपल्यासारखीच मन:स्थिती बऱ्याच मुलांची आहे. मग काय? पहिल्याच रात्री, मी आणि आणखी एका मुलाने शाळेतून पळून जायचे ठरवले. अर्थात, आमच्या 'अर्भक मेंदू' मध्ये तयार झालेला तो बेत तितकाच अपरिपक्व आणि फुसका होता. होस्टेलच्या बाहेर जेमतेम १०-१५ पावले आलो असू, तेवढ्यात आमच्या होस्टेलच्या मेट्रन, रिचर्ड ऑन्टींच्या बोलण्याचा आवाज कानावर पडला. उलट्या पावली आम्ही दोघांनी धूम ठोकली, आणि तडक आपापल्या बिछान्यात शिरलो. डोक्यावर पांघरूण घेऊन जे झोपलो, ते सकाळी, "नवीन मुले, उठा, तोंड धुवा, अंग स्वच्छ करा, आता पीटीची घंटा होईल" या रिचर्ड ऑन्टींच्या गोड आवाजानेच जाग आली.
मी हळू-हळू शाळेत रुळलो आणि मग रमूनही गेलो. सेनाधिकारी म्हणून आमची निवड व्हावी या उद्देशानेच सैनिक शाळेतील प्रशिक्षण आखलेले होते. शालेय अभ्यासक्रमासोबतच, पीटी-ड्रिल, मैदानी खेळ, विविध छंद जोपासण्यासाठी 'Hobby Clubs' अश्या अनेक गोष्टी त्यात होत्या. ठराविक रूटीनची शिस्त, वक्तशीरपणा, वरच्या वर्गातील मुलांशी अदबीने बोलणे-वागणे हे सगळे अंगवळणी पडू लागले. हॉस्टेलमधील वास्तव्यात, आपल्या हातून काही चूक घडल्यास, हाऊसकॅप्टन, प्रिफेक्ट अश्या पदावरच्या मोठ्या मुलांकडून मिळालेली शिक्षा निमूटपणे भोगावी लागे. एकीकडे, आमच्या शरीराची आणि मनाचीही कणखर घडवण होत होती. दुसरीकडे, NDA मध्ये दाखल झालेल्या आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांची उदाहरणे सतत आम्हाला सांगितली जायची. NDAत ट्रेनिंग घेत असलेले काही माजी विद्यार्थी क्वचित येऊन आम्हाला स्फूर्तिप्रद भाषणे देत. त्यांचे पद्धतशीर वागणे, रुबाबदार चालणे आणि आत्मविश्वासपूर्ण बोलणे मनावर ठसत होते. माझ्याही नकळत, NDA मध्येच जाण्याचे ध्येय मनात पक्के होत गेले.
अकरावीच्या, मॅट्रिकच्या वर्षात, UPSC द्वारा घेतल्या गेलेल्या NDA लेखी प्रवेश परीक्षेत मी उत्तीर्ण झालो आणि बंगलोर येथे SSB मुलाखतीचे बोलावणे आले. या मुलाखतीत यशस्वी होणे तितकेसे सोपे नसते हे ऐकून होतो. निवडप्रक्रियेची थोडीफार माहिती आम्हाला शाळेतर्फे सांगितली गेली होती. शाळेतील पीटी-ड्रिल आणि मैदानी खेळ या सर्वांमुळे शारीरिक क्षमतेत कमतरता असायचे कारणच नव्हते. परंतु, SSB निवडप्रक्रियेत, शारीरिक क्षमता तपासली जात नाही. उमेदवाराची मानशास्त्रीय जडण-घडण, त्याच्या अंगी असलेले नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, प्रतिकूल परिस्थितीतही मनाचे संतुलन राखण्याची क्षमता, हे सर्व जोखले जाते.
आम्ही काही मोजकीच मुले SSB मुलाखतीत यशस्वी झालो. त्यानंतर वैद्यकीय चाचणीसाठी आम्हाला बंगलोरमध्येच असलेल्या एअर फोर्स कमांड इस्पितळात नेण्यात आले. तेथे खूपच गर्दी असल्याने, बराच काळ थांबून राहिल्यानंतर, अखेर आमची तपासणी सुरु झाली. अमुक नंबरपेक्षा अधिक पॉवरचा चष्मा नसावा, गुडघे एकमेकांना घासणारे (Knock Knees) नसावेत, पायांचे तळवे सपाट नसावेत, अश्या प्रकारच्या बारीक-सारीक चाचण्या झाल्या. त्यानंतर डॉक्टरांनी, हृदय, फुफ्फुसे, आणि पोटातील अंतर्गत अवयवांचीही तपासणी केली. हे सगळे होईपर्यंत दुपारचे दोन वाजून गेले होते. आमच्या हातात वैद्यकीय अहवाल ठेवला गेला आणि आम्हाला आपापल्या घरी जायची परवानगी मिळाली. मात्र, मी तो अहवाल वाचताच, माझ्या पायाखालची वाळू सरकू लागली. मला Hepatomegaly म्हणजेच, Enlarged Liver असल्यामुळे अनफिट ठरविण्यात आले होते. वयाच्या सतराव्या वर्षी, तब्येतीची कोणत्याही स्वरूपाची तक्रार नसताना अचानक मला सांगण्यात आले होते की माझ्या यकृतावर सूज आहे आणि त्यामुळे मी सेनाधिकारी होऊ शकणार नाही. या वैद्यकीय अहवालानंतर, एका ठराविक मुदतीत, माझी पुनर्तपासणी करून घेण्याचा अधिकार मला होता. पण, डोक्यावर तलवार तर टांगली गेली होतीच.
अतिशय निराश, उदास आणि चिंतित मनस्थितीत मी पुण्याला घरी पोहोचलो. "आता माझं काय होणार?" हा प्रश्न मला आणि, माझ्याहीपेक्षा अधिक, माझ्या आई-बाबांना भेडसावू लागला. NDA शिवाय भविष्यात वेगळं काही करण्याचा विचार तोपर्यंत केलेला नव्हता. NDA मध्ये प्रवेश मिळाल्यानंतर, माझ्या पालकांवर माझा काहीच आर्थिक भार पडणार नव्हता. शिवाय, आर्मीमधील अभिमानास्पद करियर आणि मानमरातबाच्या आयुष्याची निश्चिती होणार होती. पण आता, अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. एखाद्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी हालचाल करणे भाग होते. आजच्या काळात, 'कॉलेज-प्रवेश' ही मुलांचा आणि पालकांचा अंत पाहणारी आणि अनेक दिवस मीडियाला चघळायला मिळणारी च्युईंग गम झालेली आहे. सुदैवाने, त्यावेळी तसं नव्हतं. माझ्या अकरावीच्या मार्कांवर मला सायन्सला सहजी प्रवेश मिळू शकत होता. पण, माझ्या मनाचा खरा ओढा आर्टस् साईडला होता. शाळेत असल्यापासून मराठी, हिंदी, आणि इंग्रजी कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके वाचण्यात मला रस होता. जर वैद्यकीय पुनर्तपासणीमध्ये 'फिट' ठरलो असतो तर NDAमध्येच जायचे हे नक्की होते. पण तसे न झाल्यास मात्र मला आवडणाऱ्या, कला शाखेचा अभ्यासक्रमच मी निवडणार अश्या हट्टाने मी पुण्याच्या सर परशुरामभाऊ कॉलेजात BA ला प्रवेश घेतला आणि कॉलेजात जाऊ लागलो.
सैनिक शाळेच्या शिस्तशीर वातावरणात सात वर्षे काढल्यानंतर कॉलेजातले स्वच्छंद वातावरण निश्चितच सुखद होते. 'All Boys' School' मधून बाहेर पडल्यानंतर कॉलेजतरुणींचा चिवचिवाट मोहक वाटणे स्वाभाविकच होते. परंतु, इंग्लिश लिटरेचर, जर्मन, मानसशास्त्र, असे माझ्या आवडीचे छान-छान विषय शिकायला मिळू लागल्याने, तासांना दांडी मारून "डोळे शेकायला" बाहेर हिंडण्याचा मोह मला अजिबात होत नव्हता. गंमत अशी होती की, NDA मध्ये प्रवेश मिळाला तर, "अब तो लाईफ बन गया" अशी स्थिती होणार होती. त्याउलट, आर्टस् साईडला गेल्यानंतर काही नेत्रदीपक असे करियर मिळण्याची निश्चिती त्या काळातदेखील नव्हतीच. एकीकडे, वैद्यकीय फेरतपासणीत फिटनेस सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मला हालचाल करणे भाग होते. पण दुसरीकडे हे नवीन आयुष्यही मला आवडू लागले होते.
काही दिवसातच, पुण्यातील नामवंत फिजिशियन डॉ. फडकेंची अपॉइंटमेंट आम्ही घेतली. त्यांनी अतिशय बारकाईने माझी तपासणी केली. माझी मनस्थिती ओळखून, उत्कंठा अधिक न ताणता ते हसून म्हणाले, "मला तुझ्या यकृतावर सूज वगैरे काहीही आढळून आलेली नाही. कदाचित तुला घाई-गडबडीत तपासून अनफिट ठरवले गेले असावे असे मला वाटते. तुझे लिव्हर उत्तम आणि निरोगी असल्याचा अहवाल मी तुला देतो. तो घेऊन पुनर्तपासणीसाठी जा. माझ्या मते, तू फिट ठरायला काहीच अडचण येणार नाही." डॉक्टरांचे शब्द ऐकून बराच हुरूप आला, तरीही मनात धास्ती होतीच.
सैनिक शाळेच्या शिस्तशीर वातावरणात सात वर्षे काढल्यानंतर कॉलेजातले स्वच्छंद वातावरण निश्चितच सुखद होते. 'All Boys' School' मधून बाहेर पडल्यानंतर कॉलेजतरुणींचा चिवचिवाट मोहक वाटणे स्वाभाविकच होते. परंतु, इंग्लिश लिटरेचर, जर्मन, मानसशास्त्र, असे माझ्या आवडीचे छान-छान विषय शिकायला मिळू लागल्याने, तासांना दांडी मारून "डोळे शेकायला" बाहेर हिंडण्याचा मोह मला अजिबात होत नव्हता. गंमत अशी होती की, NDA मध्ये प्रवेश मिळाला तर, "अब तो लाईफ बन गया" अशी स्थिती होणार होती. त्याउलट, आर्टस् साईडला गेल्यानंतर काही नेत्रदीपक असे करियर मिळण्याची निश्चिती त्या काळातदेखील नव्हतीच. एकीकडे, वैद्यकीय फेरतपासणीत फिटनेस सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मला हालचाल करणे भाग होते. पण दुसरीकडे हे नवीन आयुष्यही मला आवडू लागले होते.
काही दिवसातच, पुण्यातील नामवंत फिजिशियन डॉ. फडकेंची अपॉइंटमेंट आम्ही घेतली. त्यांनी अतिशय बारकाईने माझी तपासणी केली. माझी मनस्थिती ओळखून, उत्कंठा अधिक न ताणता ते हसून म्हणाले, "मला तुझ्या यकृतावर सूज वगैरे काहीही आढळून आलेली नाही. कदाचित तुला घाई-गडबडीत तपासून अनफिट ठरवले गेले असावे असे मला वाटते. तुझे लिव्हर उत्तम आणि निरोगी असल्याचा अहवाल मी तुला देतो. तो घेऊन पुनर्तपासणीसाठी जा. माझ्या मते, तू फिट ठरायला काहीच अडचण येणार नाही." डॉक्टरांचे शब्द ऐकून बराच हुरूप आला, तरीही मनात धास्ती होतीच.
पुनर्तपासणीमध्ये, बंगलोरमधील त्याच एअर फोर्स इस्पितळातील एका वरिष्ठ डॉक्टरांनी मला तपासले. त्यानंतर त्यांनी तो 'अनफिट' चा शेरा असलेला माझा जुना अहवाल पुन्हा निरखून पाहिला. क्षणभर माझ्याकडे पाहिले आणि, "Ridiculous!" हा एकच शब्द बोलले. माझ्या हृदयाची धडधड शिगेला पोहोचली. पण, पुढच्याच क्षणी त्यांनी माझ्या कागदावर "Fit" असा शेरा लिहिला आणि सही केली. माझा जीव भांड्यात पडला. आता NDA मधील प्रवेशाचा माझा मार्ग सुकर झाला होता.
माझ्या लिव्हरवर सूज असल्याचा तो 'अनफिट' अहवाल जर खरा ठरला असता तर माझ्या सैन्यजीवनाला सुरुवातच झाली नसती. कलाशाखेतील उच्च पदव्या मिळवून मी कदाचित काहीतरी वेगळंच केलं असतं. पण, आर्मीच्या नोकरीमध्ये मला आलेल्या अतिशय अद्भुत अश्या अनुभवांना मात्र मी मुकलो असतो, आणि सैन्यजीवनातल्या रम्य कथा लिहायचा-सांगायचा तर प्रश्नच उद्भवला नसता. त्या दृष्टीने, "Life depends upon the Liver!" हे वाक्य माझ्या जीवनाला तंतोतंत लागू पडते असेच म्हणावे लागेल !
मागे वळून पाहता, मी असेही म्हणू शकेन...
"लिव्हर सलामत, तो लाईफ झकास !"
"लिव्हर सलामत, तो लाईफ झकास !"
सर तुमचे लेख माझ्यासाठी खुप प्रेरणादायी आहेत...JAG मध्ये प्रवेश करण्यासाठी केलेले मार्गदर्शन कधीही विसरू शकणार नाही.
ReplyDeleteखूप छान लेख, लेखन कौशल्य खूप सुरेख
ReplyDeleteLife is worth living.. Col Pandit
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteमस्त लिखाण
ReplyDeleteMedical test can test your mental powerparticularly if done in civil hospital.Nice narrative.
ReplyDeleteYou substantiated the old.saying in your own way (smile)! It is heartening that you have preserved the literary side of your peronality and continue to write of your experiences and thought. It is always good to read ypur narratives - comments.
ReplyDeleteMilind Ranade
सर तुमच्या अप्रतिम लेखणी तून आमची उत्सुकता शिगेला पोहोचली
ReplyDeleteकधी लिव्हर तर कधी heart murmurs! वाचून खूप छान वाटले की थोड्या वेळे साठी आपण 'कॉलेजतरुणींचा चिवचिवाट' चा आनंद घेतला व पुढे सैनया शी जुळुन प्रशंसनीय कार्य केले.
ReplyDeleteYou have made a reference to my joining Sainik School;True. Nonetheless, to link up all these facts, arrange them and marshal them keeping it relevant to the story'st is certainly a tricky task. Both the facts, of your taking interest in joining armed forces at early stage looking the a glamour around my joining Sainik School Bijapur , and the fact of the impediment caused by wrong report about your liver, which could have derailed your aspirations and crashed your dreams; has been well connected. You have found a great way of connecting the dots. Visionary writing.
ReplyDeleteअप्रतीम खरच ईच्छा शक्ती पबल आहे
ReplyDeleteTuzya NDA praweshacha anand dwigunit karanyasathich ha ek dhakka milala bahutek. chhan lihile ahes. Jyotsna Karandikar, Pune
ReplyDelete😀🙏
Deleteलिव्हरच्या अहवालामुळे आपण NDA च्या शिक्षणामुळे खचून न जाता दुसरा पर्याय निवडाला.रुळायला सुरवात केली.हल्लीची मुले मनाविरुद्ध थोडे जरी झाले तरी खचून जातात.मानसिक
ReplyDeleteधन्यवाद! 🙏
Delete