डिसेंबर १९८७ मधली गोष्ट आहे. त्यावेळी मी कॅप्टन हुद्यावर होतो आणि मध्य प्रदेशात महू येथील मिलिटरी इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये बी.टेक च्या तिसऱ्या वर्षात शिकत होतो. १९८६मध्ये आमचे लग्न झाले तेंव्हा, स्वाती सोलापूरला पोस्टग्रॅज्युएशन करत होती. १९८७च्या जून-जुलैपासून ती महूला माझ्यासोबत प्रथमच राहायला आली होती. तिला सैन्यातील जीवन तसे अजूनही नवीनच होते. मी हळू-हळू तिला एकेका गोष्टीची, सैन्यातील जीवनशैलीची, शिष्टाचारांची ओळख करून देत होतो.
एका निवांत संध्याकाळी, मी आणि स्वाती, ऑफिसर्स क्लबमध्ये गप्पा मारत बसलो होतो. अचानक एक ऑफिसर आमच्यासमोर येऊन उभा राहिला आणि आम्हाला अभिवादन करत अदबीने म्हणाला,
एका निवांत संध्याकाळी, मी आणि स्वाती, ऑफिसर्स क्लबमध्ये गप्पा मारत बसलो होतो. अचानक एक ऑफिसर आमच्यासमोर येऊन उभा राहिला आणि आम्हाला अभिवादन करत अदबीने म्हणाला,
त्याला मी न ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. तो NDAमध्ये माझ्याच स्क्वाड्रनमध्ये (NDA मध्ये होस्टेलला स्क्वाड्रन असे नाव आहे) माझ्यापेक्षा दीड वर्षे ज्युनियर होता. आज तोही माझ्यासारखाच कॅप्टनच्या हुद्द्यावर इन्फन्ट्री, म्हणजे पायदळातील अधिकारी होता. एक खुर्ची ओढून मी त्याला बसायला सांगितले. मोठ्या उत्साहाने तो माझ्याशी बोलायला लागला,
"सर, मी ऑक्टोबरपासूनच Op Pawan मध्ये होतो. आमची बटालियन अजूनही श्रीलंकेतील जाफना भागातच आहे. माझ्या पायात गोळी लागली होती. हॉस्पिटलमधून फिट होऊन बाहेर पडल्या-पडल्या इथल्या 'इन्फन्ट्री स्कूल' मध्ये एक ट्रेनिंग कोर्स करायला मला पाठवलंय."
'Op Pawan', ही भारतीय आर्मीने, श्रीलंकेचे सैन्य आणि बंडखोर 'तामिळ टायगर' यांच्यादरम्यान शांति प्रस्थापित करण्याकरिता सुरु केलेली कारवाई होती. मी काही बोलणार तेवढ्यात त्यानेच स्वातीशी बोलायला सुरुवात केली,
"काय सांगू, मॅडम. तामिळ टायगर म्हणजे खरोखरच श्रीलंकेच्या जंगलातले वाघ आहेत वाघ! त्यांच्याच गुहेत शिरून त्यांच्याशी टक्कर घेणं म्हणजे चेष्टा नव्हती. प्रत्यक्ष समोरासमोर युद्ध लढणं सोपं असतं. पण गनिमी काव्याने लढणाऱ्यांसोबत २४ तास बुद्धिबळाचा खेळ चालतो. फरक इतकाच, की त्यात पटावरचे हत्ती-घोडे-उंट नव्हे तर आमच्या खांद्याला खांदा लावून लढणारे सहकारी ऑफिसर आणि जवान आम्हाला गमवावे लागतात."
"पण तुम्हाला खरं सांगतो, मॅडम. ही असली युद्धे झेलायला आम्ही शरीराने सक्षम आणि मनाने खंबीर झालो त्याचं एक कारण म्हणजे NDAतलं फिजिकल ट्रेनिंग, आणि दुसरं कारण म्हणजे बापट सरांसारख्या अनेक सिनियर्सनी आम्हाला दिलेलं स्पेशल ट्रेनिंग."
हे दुसरं कारण स्वातीला समजणं जरासं अवघड होतं. ती त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहू लागली. मी त्या अधिकाऱ्याला डोळ्याने दटावायचा प्रयत्न करीत होतो. पण, आता डोळ्यांनी दाबला जायला तो काही NDAचा पहिल्या टर्मचा कॅडेट नव्हता! शिवाय, त्याच्या बोलण्यामुळे, स्वातीचे कुतूहल जागृत झाले होते. ती लक्षपूर्वक ऐकत आहे हे त्याच्या लक्षात आल्यामुळे, माझ्या दटावणीकडे पाहून न पाहिल्यासारखे करत तो हसतच पुढे बोलू लागला.
"मॅडम, NDAमध्ये बापट सर म्हणजे टेरर होते टेरर! आम्ही ज्युनियर्स जबरदस्त घाबरायचो त्यांना. कसल्या कडक शिक्षा द्यायचे म्हणून सांगू तुम्हाला. NDAत आम्हाला अश्या सिनियर्सनी चांगलं रगडलं नसतं तर आम्ही इतके टणक झालोच नसतो. अर्थात, हे कळायचं वय नव्हतं आमचं तेंव्हा. पण आता मात्र कळतंय. तामिळ टायगर्सशी जंगलांमध्ये लढताना अनेक वेळा, NDAमधल्या त्या स्पेशल ट्रेनिंगची मला आठवण झाली.
I really miss those days!
खरंच सांगतो, आत्तासुद्धा सरांनी मला काहीही शिक्षा दिली तरी मी ती आनंदाने भोगायला तयार आहे."
आर्मीबद्दल, NDA आणि IMAमधल्या माझ्या जीवनाबद्दल, त्या वेळेपर्यंत स्वातीला अजूनही तशी कमीच माहिती होती. आता या माणसाने सहज बोलता-बोलता, तिला अर्धवट माहिती दिली आणि तिचा गैरसमज झाला तर काय? या विचाराने मी जरा अस्वस्थ झालो. त्याला थांबवणे भाग होते.
"चल तर मग शिक्षा भोगायला. Tell me, what's your poison?" असं म्हणत मी त्याला हाताला धरून उठवले आणि त्याला ड्रिंक ऑफर करण्यासाठी बारच्या दिशेला खेचले.
"चल तर मग शिक्षा भोगायला. Tell me, what's your poison?" असं म्हणत मी त्याला हाताला धरून उठवले आणि त्याला ड्रिंक ऑफर करण्यासाठी बारच्या दिशेला खेचले.
आपापले ड्रिंक घेऊन काही काळ गप्पा मारत आम्ही बारपाशी रेंगाळलो पण, तेवढ्यातच त्याला कोणीतरी भेटले आणि मलाही स्वाती एकटीच बसली असल्याची जाणीव झाली. मी परतताच स्वाती म्हणाली, "अरे, किती वेळ? आणि तो ते शिक्षेचं काय म्हणत होता?"
'काही नाही गं, NDAमध्ये सगळ्याच ज्युनियर्सचं त्यांच्या सीनियर्सकडून जे Mental toughening केलं जातं त्याबद्दल सांगत होता तो."
"अच्छा, म्हणजे रॅगिंग?"
"छे गं, रॅगिंग काय म्हणतेस? NDA म्हणजे काय साधं कॉलेज वाटलं का तुला?"
आपला नवरा रॅगिंग करण्यात पुढे होता की काय? असा तिचा समज व्हायच्या आत, तिला कॉलेज आणि NDA यातला मूलभूत फरक नीट समजावून सांगणे आवश्यक होते. ज्युनियर्सची हलकी-फुलकी थट्टा-मस्करी करणे, आणि त्याद्वारे त्यांची ओळख करून घेणे, इतपतच कॉलेजमधल्या रॅगिंगचा माफक उद्देश असतो. मात्र, NDA मध्ये सिनियर्स आपल्या ज्युनियर्सना जे अनौपचारिक ट्रेनिंग देतात त्याला निव्वळ 'रॅगिंग' म्हणणे चुकीचे ठरेल. पण, माझ्या लक्षात आले की तिला ते सगळे थोडक्यात सांगणे शक्य नव्हते. नंतर कधीतरी शांतपणे सगळे समजावून सांगावे असा विचार करून, मी खुबीने विषय बदलला आणि आम्ही जेवायला गेलो.
या घटनेनंतर काही दिवसातच, ३१ डिसेंबरला, नवीन वर्षाच्या पार्टीसाठी मी आणि स्वाती क्लबमध्ये पोचतो न पोचतो तोवरच माझ्या पाठीवर थाप पडली, "अबे साले बापट, कहाँ ध्यान है यार?" मी वळून त्या ऑफिसरला पाहताच आम्ही आनंदाने ओरडतच एकमेकांना मिठी मारली. NDAतल्या माझ्याच, म्हणजे ५८व्या कोर्समधला आणि माझ्याच स्क्वाड्रनमधला तो माझा कोर्समेट होता. १९८१मध्ये IMA डेहरादूनमधून कमिशन घेऊन आम्ही बाहेर पडल्यानंतर आज प्रथमच तो भेटत होता.
पुढची पंधरा-वीस मिनिटे आम्हा दोघांशिवाय आसपास इतरही कोणी आहे याचा आम्हाला विसरच पडला होता. एकापाठोपाठ एक जुन्या गप्पा निघत राहिल्या. जरा वेळाने माझ्या कोटाची बाही कोण खेचतंय म्हणून मी पाहिले तेंव्हा मला भान आले की आपल्याला एक बायकोही आहे! गंमत म्हणजे, त्यामुळे त्यानेही चपापून आपल्या बायकोकडे पाहिले!
मी स्वातीची आणि त्याने आपल्या बायकोची ओळख करून दिली. जेमतेम दोन औपचारिक वाक्ये एकमेकांच्या बायकांशी आम्ही बोललो असू. लगेच तो मला म्हणाला, "तुला ५४व्या कोर्सचा, आपल्या स्क्वाड्रनमधला धवन आठवतोय ना ?" खरे म्हणजे धवनसारख्या सिनियरला आमच्या कोर्समेट्सपैकी कोणीही विसरणे अशक्य होते.
मी म्हटलं, "अरे बाप रे, धवन आणि त्याचे ते दुपारचे स्पेशल सेशन्स! आपल्या कोर्सवर तर त्याचं 'विशेष प्रेम' होतं. त्याच्या तावडीत सापडून कितीतरी दिवस दुपारच्या रणरणत्या उन्हात आपण जोर काढत असायचो! एकदा तर हातावर चांगले टरारून फोड आले होते, आठवलं? बरं त्याची आठवण अचानक कशी काय आली?"
"अरे, तो आत्ता मला दिसलाय इथे. चल त्याला भेटू या." एवढे त्याने म्हणताच आम्ही दोघेही आमच्या बायकांना तिथेच सोडून गर्दीत घुसलो. काही क्षणातच धवन दिसला.
"धवन सर!" अशी हाक ऐकताच तो वळला आणि क्षणार्धात आम्हा तिघांचीही गळाभेट झाली. पुन्हा पंधरा-वीस मिनिटे गप्पांमध्ये सहज गेली असतील. केंव्हातरी आम्हा दोघांना, पुन्हा आपापल्या बायकांची आठवण झाली आणि एकमेकांचा निरोप घेऊन आम्ही परतलो. स्वातीची नाराजी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
दुसऱ्या दिवशी तिने मला पकडलेच.
"आनंद, तुम्ही NDAमधले सिनियर-ज्युनियर जेंव्हा एकमेकांना भेटता, तेंव्हा सिनियर्सनी त्यांच्या ज्युनियर्सना दिलेल्या कसल्या-कसल्या शिक्षांच्या आठवणी अगदी हसत-हसत काढता हे कसे काय? आणि ते रॅगिंग नव्हे असेही तू मला ठासून सांगतोस. तुम्हाला जबरदस्त शिक्षा देणाऱ्या सिनियरकडे तुम्ही ज्युनियर्स जाता काय, त्याची गळाभेट घेता काय, आणि त्याच्याशी अगदी मैत्रीपूर्ण गप्पा मारता काय! हा सगळा काय प्रकार आहे? मला तर हे सगळेच जरा विचित्र वाटते. आणि मी यापूर्वीही दोन-तीन वेळा पाहिले आहे. एखादा कोर्समेट भेटल्यावर तर तुमच्या बायकोचाही तुम्हाला विसर पडतो? तुझे सगळे कोर्समेट्स म्हणजे माझ्या सवतीच म्हणायच्या!"
पुढे अनेकदा, वेगवेगळ्या प्रसंगांच्या वर्णनांमधून, आमचे NDAतले ट्रेनिंग, सिनियर्सनी दिलेले 'स्पेशल ट्रेनिंग', आणि कोर्समेट्ससोबतचे आमचे घट्ट नाते, यांबद्दल स्वातीने ऐकले. तसेच, NDA पाहायला आम्ही गेलो असताना तिथले वातावरणही तिने अनुभवले. हळू-हळू, एकूणच सगळ्या सेनाधिकाऱ्यांचे आपल्या सिनियर, ज्युनियर व कोर्समेट्स सोबतचे नाते, आणि Ex-NDA अधिकाऱ्यांच्या 'कोर्स स्पिरिट' व 'स्क्वाड्रन स्पिरिट'चे रहस्य तिला उमगत गेले. त्याबद्दल मी लवकरच विस्ताराने लिहीन.
सगळे काही समजून-उमजून, आजतागायत स्वातीने तिच्या सगळ्या 'सवतींना' गुण्या-गोविंदाने स्वीकारले आहे. पण, आजही माझा एखादा कोर्समेट दुरून येताना दिसताच आमच्या मुलांना अंदाज येतो की, काही काळापुरता तरी मी त्यांना आणि त्यांच्या आईला विसरून जाणार आहे!
त्यावरून, स्वाती आणि मुले माझी भरपूर चेष्टा करायला चुकत नाहीत. लहान असताना तर आमची मुले बिनधास्तपणे स्वातीला म्हणत असत, "आई, तुझी सवत आली बघ!"
Good interaction among juniors and seniors
ReplyDeleteThanks🙏
Deleteमस्त
ReplyDeleteधन्यवाद. 🙏
DeleteNDA मधली सवत! 👌😊
ReplyDeleteत्या रस्त्यावर न चाळलेल्याला ते कळणे कठीण आहे, पण हा ब्लॉग ते काम छान करत आहे.
बरोबर! तोच हेतू आहे. 🙂
DeleteAnand, great writing. For a few heartbeats I wondered about the reunion memories from MHOW 😀😀
ReplyDeleteतुमच्या घरी? १४-१५ वर्षे झाली. 🙂
Delete🙏
Thanks Colonel for painting such a live picture of the spirit among coursemates seniors, juniors at NDA.
ReplyDeleteYou being a terror comes as a surprise !! Your junior acknowledging that you being his senior was of immense help is a matter of pride for me.
Milind Ranade
Thanks Milind!
DeleteAs for your disbelief in my being a terror, I can only say that appearances are usually deceptive! 😂
This comment has been removed by the author.
ReplyDeleteInteresting is bland civilian word ...I am sure NDA must have better vocabulary to appreciate this article
ReplyDelete😊धन्यवाद!
DeleteYour sentiments count a lot more than the 'right' vocabulary!
🙂🙏
ReplyDeleteभारी .. 😀👌🏻
ReplyDelete🙂👍
ReplyDeleteमित्रांबरोबर गळाभेट जुन्या आठवणी.हे सर्व नंतर छान असत पण पुढे छान होण्यासाठीचे आगोदरचे कष्ट म्हणजेआगीतून ताऊन सुलाखून बाहेर पडलेले १००नंबरो सोनेच असते.
ReplyDeleteनिश्चितच! 👍🙂
Delete