Labels

Monday, 27 April 2020

खेल खेल में सनम...

खेळाडू' आणि 'अभ्यासू' असे जर दोन ढोबळ गट केले तर माझी गणती दुसऱ्या गटात होण्याची शक्यता अधिक आहे. सोलापूरला प्राथमिक शाळेत असताना, मित्रांसोबत मधल्या सुटीतले ठराविक खेळ मी खेळायचो. उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी, आम्ही आते-मामे-मावस भावंडे मिळून बैठे खेळ आणि क्वचित फुटबॉलही खेळत असू. माझ्या वडिलांना क्रिकेट आवडत असल्याने तेही आमच्या "गल्ली क्रिकेट" मध्ये सहभागी होत असत. पण एकंदरीत माझा जास्त ओढा वाचनाकडे असे.

सातारच्या सैनिक शाळेत गेल्यावर,

Friday, 17 April 2020

उन्मळलेल्या वृक्षाचे बळी

'ऑपरेशन ब्लू स्टार'ची कारवाई, खालिस्तानी अतिरेक्यांच्या, आणि त्यांना भरीस घालणाऱ्या पाकिस्तानी यंत्रणेच्या, जिव्हारी बसलेला घाव होता. 'सूड' या मानवी भावनेचं, अव्याहत चालू शकणारं, असं एक चक्र असतं. 'ब्लू स्टार' चा सूड खालिस्तानी अतिरेक्यांनी पुरेपूर उगवला. पण, त्यानंतर घडलेल्या काही घटनांमुळे, आजतागायत चालू असलेल्या या सूडचक्रात काही अतिमहत्वाच्या व्यक्तींसोबतच, कित्येक निरपराध भारतीयांचेही बळी गेले आहेत. त्यांच्यापैकी काहींशी माझा दूरान्वयाने का असेना, पण संबंध आला होता.

१९८४ साली ऑक्टोबरचा संपूर्ण महिना, मी सिक्कीमची राजधानी गंगटोकपासून ३०-३२ कि.मी. दूर, भारत-चीन सीमेजवळ,

Monday, 13 April 2020

ऑपरेशन ब्लू स्टारचे ओरखडे

जून १९८१ ते मे १९८४ या काळात, मी अमृतसरमध्ये माझ्या पहिल्याच पोस्टिंगवर असताना, तेथील एकंदर वातावरणात हळूहळू घडत गेलेले बदल पाहत होतो. पण भारताच्या इतिहासातल्या एका अतिशय गंभीर आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या वळणावर आपण उभे आहोत हेेे त्यावेळी समजणे अवघड होते.
   
पंजाब प्रांतामध्ये एकंदरीत पोलीस आणि सर्वच प्रकारच्या लष्करी व निमलष्करी दलांना भरपूर मान आहे. विशेषतः भारतीय सेनेच्या अधिकारी व जवानांना मिळणारी जी वागणूक मी पंजाबात अनुभवली,

बांगलादेशीयांची अशीही 'हेरगिरी'!

"आमार शोनार बांगला" अश्या शीर्षकाखाली लिहिलेल्या माझ्या अनुभवात, भारतीय NCC कॅडेट आणि बांगलादेशी छात्रसैनिकांदरम्यान २००४ साली घडलेल्या एका हृदयस्पर्शी प्रसंगाचे वर्णन मी केले आहे. परंतु, त्यापूर्वीही एकदा बांगलादेशीयांशी माझा संपर्क आला होता. ती  आठवणदेखील अविस्मरणीय आहे. 

डिसेंबर १९९२ ते जून १९९६ अशी जवळजवळ साडेतीन वर्षे, अलाहाबाद SSB मध्ये

Friday, 3 April 2020

आमार शोनार बांगला

अलीकडेच सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट लिहिताना मी गुरुदेव रबिंद्रनाथ टागोरांचा उल्लेख करून त्यांच्या एका भाषांतरित कवितेतील काही ओळी उद्घ्रृत केल्या होत्या. त्यावर आलेली एक प्रतिक्रिया अतिशय लक्षवेधी होती. गुरुदेवांच्या त्या कवितेचे स्मरण मी करून दिल्याबद्दल एका बांगलादेशी मुस्लिम माणसाने