खेळाडू' आणि 'अभ्यासू' असे जर दोन ढोबळ गट केले तर माझी गणती दुसऱ्या गटात होण्याची शक्यता अधिक आहे. सोलापूरला प्राथमिक शाळेत असताना, मित्रांसोबत मधल्या सुटीतले ठराविक खेळ मी खेळायचो. उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी, आम्ही आते-मामे-मावस भावंडे मिळून बैठे खेळ आणि क्वचित फुटबॉलही खेळत असू. माझ्या वडिलांना क्रिकेट आवडत असल्याने तेही आमच्या "गल्ली क्रिकेट" मध्ये सहभागी होत असत. पण एकंदरीत माझा जास्त ओढा वाचनाकडे असे.
सातारच्या सैनिक शाळेत गेल्यावर,
अनेक मैदानी खेळांशी माझी रीतसर ओळख झाली. रीतसर म्हणण्याचे कारण असे की, तोपर्यंत क्रिकेट किंवा हॉकीमध्ये वापरले जाणारे गार्ड आणि पॅड, किंवा फुटबॉलचे स्टडवाले बूट मी कधी पाहिलेही नव्हते. पुढे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA), आणि भारतीय सैन्य अकादमी (IMA) मधील प्रशिक्षणाच्या काळात व आर्मीच्या नोकरीमध्ये खेळांशी अधिकाधिक संबंध येत गेला. काही खेळ मी नुसतेच खेळलो, पण बॉक्सिंग आणि हॉकीमध्ये मात्र मी चांगलेच प्राविण्य मिळवले. 'स्क्वॉश' या खेळानेही मला आकर्षित केले होते. ट्रेनिंग आणि सर्व्हिसच्या सुरुवातीच्या काळात हा खेळ शिकायची संधीही सहज उपलब्ध असल्याने मी शिकलो आणि बरीच वर्षे खेळत राहिलो. 'शिकाऊ' असतानाच्या काळातला एक मजेदार प्रसंग चांगलाच लक्षात राहिला आहे.
सातारच्या सैनिक शाळेत गेल्यावर,
अनेक मैदानी खेळांशी माझी रीतसर ओळख झाली. रीतसर म्हणण्याचे कारण असे की, तोपर्यंत क्रिकेट किंवा हॉकीमध्ये वापरले जाणारे गार्ड आणि पॅड, किंवा फुटबॉलचे स्टडवाले बूट मी कधी पाहिलेही नव्हते. पुढे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA), आणि भारतीय सैन्य अकादमी (IMA) मधील प्रशिक्षणाच्या काळात व आर्मीच्या नोकरीमध्ये खेळांशी अधिकाधिक संबंध येत गेला. काही खेळ मी नुसतेच खेळलो, पण बॉक्सिंग आणि हॉकीमध्ये मात्र मी चांगलेच प्राविण्य मिळवले. 'स्क्वॉश' या खेळानेही मला आकर्षित केले होते. ट्रेनिंग आणि सर्व्हिसच्या सुरुवातीच्या काळात हा खेळ शिकायची संधीही सहज उपलब्ध असल्याने मी शिकलो आणि बरीच वर्षे खेळत राहिलो. 'शिकाऊ' असतानाच्या काळातला एक मजेदार प्रसंग चांगलाच लक्षात राहिला आहे.
१९८३ मध्ये मी अमृतसरला असताना, मला अडीच-तीन महिन्यांकरिता जालंधरला जावे लागलेे. जालंधर छावणीतील आमच्या एका छोट्या तुकडीचा कार्यभार तात्पुरता सांभाळण्याकरिता मला पाठवले गेले होते. प्रथमच, मला स्वतंत्र असा चार्ज मिळाल्याने संध्याकाळी जरा मोकळा वेळ मिळू लागला. तेंव्हा मी नियमितपणे स्क्वॉश खेळायचे ठरवले.
स्क्वॉश हा खेळ दोनच खेळाडू, रॅकेट व बॉलने खेळतात. मात्र ते दोघे, टेनिसप्रमाणे एकमेकांसमोर नसून शेजारी-शेजारी असतात. समोरच्या भिंतीवर रॅकेटने बॉल मारायचा आणि प्रतिस्पर्ध्याने तश्याच प्रकारे तो परतवायचा असा हा खेळ चालतो. आपण मारलेला फटका प्रतिस्पर्ध्याला उचलता आला नाही की आपल्याला एक पॉईंट मिळतो.
मी रोज रॅकेट घेऊन जालंधर छावणीमधील स्क्वॉश कोर्टवर जाऊ लागलो. मला अजूनही खेळाचा विशेष अनुभव नव्हता. त्यामुळे सुरुवातीला, कोर्टच्या वर बाल्कनीत असलेल्या बाकड्यावर बसून, इतरांचा खेळ पाहत, मी त्यांच्या खेळाचा अंदाज घेऊ लागलो. मला सोबत घेऊन खेळवत-खेळवत चांगले शिकवू शकेल असा कोणी पार्टनर मिळतो का हेही मी शोधत असे. पण सहसा दोघादोघांच्या जोड्या आधीपासून ठरलेल्या असायच्या. एकदोघांनी स्वतःचा पार्टनर येईपर्यंतच्या वेळात मला त्यांच्यासोबत खेळायची संधी दिलीही. पण ती तेवढ्यापुरतीच. एरवी, क्वचित कोर्ट रिकामे आढळल्यास भिंतीवर बॉल मारत मी एकटाच सराव करायचो.
एकदा असाच कोर्टवरच्या बाकावर बसून दोन अधिकाऱ्यांचा खेळ पाहत होतो. इतर कोणीच आसपास नव्हते. निदान, त्या दोघांचा खेळ संपल्यावर, मला एकट्याला तरी खेळायची संधी मिळेल अशी आशा होती. तेवढ्यातच, एक नाजूक आणि सुंदर तरुणी तिथे आली. खांद्यावर रॅकेट केस, कोरा करकरीत वाटणारा टी-शर्ट, पॉश असा ट्रॅक सूट आणि पायात विदेशी स्पोर्ट्स शूज, असा तिचा आकर्षक वेश होता. माझ्यासमोरच्या बाकावर बसून खाली कोर्टमध्ये चाललेला खेळ ती पाहू लागली. उंची कपडे व महागडी रॅकेट मिरवत आलेली ती तरुणी एखाद्या जनरलसाहेबांची मुलगी असावी असा कयास बांधणं विशेष अवघड नव्हतं. स्क्वॉश खेळण्यापेक्षा, कोर्टवर येऊन मिरवण्यात अधिक रस असलेले असे काही नमुने मला पाहून माहीत होते.
आजकालच्या काळात, टी-शर्टवर छापलेले विनोदी, द्व्यर्थी (किंवा क्वचित काहीसे अश्लीलही) मजकूर आणि चित्रे पाहून-वाचून आपली नजर मरून गेलेली आहे, आणि मनही निर्ढावले आहे. पण १९८३ मधला तो काळ जरासा निराळा होता. ती समोरून येत असताना तिच्या टी-शर्टवर लिहिलेल्या शब्दांनी माझे लक्ष वेधून घेतले होते. टी-शर्टच्या वरील भागात, गळ्याखाली, मोठ्ठ्या अक्षरात, अवतरण आणि उद्गारवाचक चिन्हांसहित, एकच शब्द लिहिला होता, "SQUASH!"
स्क्वॉश खेळण्यासाठीच्या संपूर्ण तयारीनिशी ती आली होती असे मानले तरी, टी-शर्टवर लिहिलेेल्या त्या शब्दाचे 'स्थानमहात्म्य' लक्षात घेता त्यातील गर्भित अर्थ चांगलाच धक्कादायक होता!
ती तरुणी एकटीच आल्याने, खेळण्यासाठी मला एक सुंदर पार्टनर मिळण्याची सुखद शक्यता निर्माण झाली होती. तिला तसे विचारावे असे वाटलेही. परंतु, मीच अजून नवशिका स्क्वॉश खेळाडू होतो. "ती पार्टनर म्हणून कितीही इंटरेस्टिंग वाटली तरी माझ्याइतकीच नवशिकी असेल का?" असा प्रश्नही मनात उत्पन्न झाला. कारण नवशिक्यासोबत स्क्वॉश खेळणं तसं खूपच कंटाळवाणं होऊ शकतं. त्या कारणास्तव तिने आपल्याला नकार दिला तर? अशी शंकाही मनात येऊन उलट-सुलट विचारांचे चक्र सुरू झाले. माझे विचारचक्र सुरू असतानाच, कोर्टवरच्या त्या दोघा अधिकाऱ्यांचा खेळ खेळून संपला. नेमक्या त्याच वेळी, माझ्यापेक्षा ४-५ वर्षे सीनिअर असलेला एक कॅप्टन हातातील रॅकेट फिरवत तेथे आला. त्या आकर्षक वेशातील तरुणीला पाहताच त्याचे डोळे लकाकले.
कुमार गंधर्वांनी गायलेल्या, "आज अचानक गाठ पडे..." या कवि अनिलांच्या कवितेतील, "निसटुनि जाई संधीचा क्षण, सदा असा संकोच नडे" या ओळींचा प्रत्यय मला आयुष्यात विविध प्रसंगी अनेकवार आला आहे. तो त्यातलाच एक क्षण होता हे मला लगेच समजले.
तो कॅप्टन चपळाईने पुढे आला. त्या तरुणीच्या चेहऱ्यावरचेे निर्विकार भाव पाहता, ते दोघे एकमेकांना ओळखत असण्याची शक्यता शून्य होती. तरीही त्या कॅप्टननेे हात पुढे करून "हाय" म्हणताच तिनेही "हॅलो" म्हटत हस्तांदोलन केले. ओळख-पाळखीत उगाच वेळ न घालवता तो लगेच म्हणाला, "माझा नेहमीचा पार्टनर अजून यायचा आहे. तोपर्यंत, तुझी हरकत नसेल तर, थोडा वेळ मी तुझ्यासोबत खेळू शकेन."
त्यावर तिनेही गोड हसून होकार दिला. आता मी बघ्याच्या भूमिकेतच राहणार आहे हे मला कळून चुकले.
तो तिला म्हणाला, "माझ्या पार्टनरने आज मला हरवण्याची पैज घेतली आहे. ते काही मी होऊ देणार नाही. तुला थोडंसं खेळवता-खेळवता माझाही वॉर्म-अप होऊन गेला तर बरंच", असे म्हणून तो पुढे निघाला.
त्या मुलीने अंगातले जॅकेट काढून ठेवले आणि तीही त्याच्यामागोमाग निघाली. तिने जॅकेट काढल्यामुळे तिच्या टी-शर्टच्या मागे जे लिहिले होते तेही मला वाचता आले. पुढील बाजूस लिहिलेला शब्द वाचल्यानंतर माझा कदाचित 'आ' वासला होता. तिच्या टी-शर्टच्या पाठीवर लिहिलेला मजकूर वाचल्यानंतर तर माझे डोळेही विस्फारले होते.
त्या मुलीने अंगातले जॅकेट काढून ठेवले आणि तीही त्याच्यामागोमाग निघाली. तिने जॅकेट काढल्यामुळे तिच्या टी-शर्टच्या मागे जे लिहिले होते तेही मला वाचता आले. पुढील बाजूस लिहिलेला शब्द वाचल्यानंतर माझा कदाचित 'आ' वासला होता. तिच्या टी-शर्टच्या पाठीवर लिहिलेला मजकूर वाचल्यानंतर तर माझे डोळेही विस्फारले होते.
खाली कोर्टमध्ये होणारा त्यांचा खेळ मी वरून पाहू लागलो. त्या अधिकाऱ्याने तिच्याकडे बॉल टाकला आणि म्हणाला, "शरीर थंड असताना लगेच खेळायला लागूू नये. जरा बॉल भिंतीवर मारायला लाग आणि हातपाय मोकळे करून घे. त्यानंतर आपण खेळायला सुरु करू. तू रेडी झालीस की सांग."
तिनेही आज्ञाधारकपणे पद्धतशीर वॉर्मिंग-अप सुरु केले. हे कप्तानसाहेब मात्र उगाचच इकडे-तिकडे हातवारे करत, तिच्या "OK" ची वाट पाहत होते.
त्या तरुणीने होकार देताच खेळ सुरु झाला. सुरुवातीला सोपी सर्व्हिस करून आणि काही हलके शॉट मारून त्याने तिला जरा खेळू दिले. त्यानंतर मात्र गालातल्या गालात हसत त्याने एक अवघड शॉट मारला आणि तिची रिऍक्शन बघायला वळला. पण त्या मुलीने तो शॉट व्यवस्थित उचलला आणि परतीचा शॉटदेखील मारला. कॅप्टनला तशी अपेक्षा नसल्याने त्याला तो उचलता आला नाही. मोठ्या खिलाडूवृत्तीने त्याने "शाबास, शाबास" म्हणून तिचे अभिनंदन केले. आता त्या मुलीची सर्व्हिस होती. तिने एक अप्रतिम सर्व्हिस केली आणि त्यानंतर जे घडलं ते मी आयुष्यभर विसरू शकणार नाही.
पुढची वीस मिनिटे, ती मुलगी लीलया खेळत होती आणि तो कप्तान मात्र, तिने चौफेर मारलेले शॉट उचलण्याचा आटोकाट प्रयत्न करीत संपूर्ण कोर्टभर पिसाटासारखा धावत होता ! शेवटी त्या कॅप्टनच्या कानातून धूर येतोय की काय अशी शंका मला आली !
लागोपाठ तिसऱ्या गेममध्येही सपशेल मार खाल्ल्यानंतर तो कसेबसे बोलला, "अरे वा, तू छानच खेळतेस ! पण मला मात्र आता जाऊन पाहायला हवं माझा पार्टनर कुठे अडकलाय ते. तुझ्यासोबत खेळायला मजा आली हं !"
असे म्हणून तो कसाबसा तिथून पसार झाला. मला आतून नुसत्या उकळ्या फुटत होत्या. तिला माझ्याबरोबर खेळायचे आमंत्रण देण्याची हिंमत मी दाखवू शकलो नव्हतो हे किती बरे झाले होते. नाहीतर माझे स्क्वॉश शिकणे तिथेच थांबले असते !
त्या मुलीच्या टी-शर्टच्या मागे लिहिले होते, "National Open Squash Championship, Jaipur". पुढे अधिक चौकशी केल्यावर समजले की ती स्वतः राष्ट्रीय स्तरावरची खेळाडू तर होतीच, आणि आर्मीच्या स्क्वॉश चॅम्पियनची पत्नीही होती.
असे म्हणून तो कसाबसा तिथून पसार झाला. मला आतून नुसत्या उकळ्या फुटत होत्या. तिला माझ्याबरोबर खेळायचे आमंत्रण देण्याची हिंमत मी दाखवू शकलो नव्हतो हे किती बरे झाले होते. नाहीतर माझे स्क्वॉश शिकणे तिथेच थांबले असते !
त्या मुलीच्या टी-शर्टच्या मागे लिहिले होते, "National Open Squash Championship, Jaipur". पुढे अधिक चौकशी केल्यावर समजले की ती स्वतः राष्ट्रीय स्तरावरची खेळाडू तर होतीच, आणि आर्मीच्या स्क्वॉश चॅम्पियनची पत्नीही होती.
मस्त लिखाण,
ReplyDeleteमिलिंद वैद्य
🙂🙏
Deleteमस्त
Delete🙏🙂
DeleteI am becoming your fan of your writing Anand.
ReplyDeleteVery good.
You should compile all these in a book.
🙂🙏
DeleteGood one .. I thought in the end the girl might be Mekhala Subedar, daughter of Col Raja Subedar.. incidentally our neighbour's in Nashik. She too is a National champion & represented India internationally too. Enjoyed reading.. Col Mukund Pandit
ReplyDelete🙂 Col. Raja Subhedar was Dy. President 34 SSB where I was a GTO. I've seen Mekhala play when she was a kid. She blossomed into a fantastic player!
Deleteसहीच.👍👍
ReplyDelete🙂🙏
Deleteसुंदर लिखाण सर!!
ReplyDelete🙏🙂
Deleteमस्त!!
ReplyDeleteJyotsna Karandikar
😁👍
ReplyDeleteछान! never be prejudiced:)
ReplyDeleteTrue!🙂
DeleteSquash चा अर्थ चेंगरणे असा होतो. त्या कॅप्टन साहेबांची चेंगरचेंगरी आणि तुझ्या - म्हणजे आपल्या सर्वांच्या - मनातील भुईनळे छान मांडले आहेस. :)
ReplyDelete😊👍
DeleteReading Was like hearing a running commentary from Harsha Bhogale, in an interesting match describing Sachin smashing Shane Warne all round the park. Lived it, and loved it too
ReplyDelete😂Thanks! 👍
Deleteमस्त खेळ मांडलास! मजा आली वाचायला.😊👌
ReplyDelete😁🙏
DeleteVery interesting account and enjoyed reading but if I remember correctly u had taken up squash even at NDA & IMA itself may be in small way or bigginer then. Overrall a very good read.Ajit.
ReplyDeleteYour memory fails you, sir! Never in NDA or IMA.
Deleteसर तुम्ही छान लिहिता.
ReplyDeleteधन्यवाद!🙏
Deleteआपण दृष्वैट्द्यया आनफिट झाल्कीयाव दुसरा मार्यग निवडला .NDAमधे शिक्षण घेतल्याचा फायदा.नाहितर हल्ली मुले जरा मनाविरुद्ध झाल की त्यांचे मानसिक संतुलन बिघडते. -- नीलिमा माईणकर
ReplyDeleteखरंय👍
Delete