Friday, 29 May 2020
Saturday, 23 May 2020
जितना रगडा, उतना तगडा !
NDAमधील कडक ट्रेनिंगबद्दल स्वातीला कमालीचे कुतूहल होते. अधे-मधे तुटक-तुटक माहितीच कानावर आल्याने तिची उत्सुकता अगदीच शिगेला पोहोचली होती. NDAतले पीटी-ड्रिलचे 'उस्ताद' जे वाक्य नेहमी म्हणायचे, ते तिला मी सांगितले होते "जितना रगडा, उतना तगडा!" ते सगळे उस्ताद आम्हाला चांगलेच रगडायचे, हे तिला ऐकून माहिती झाले होते. पण, सिनियर कॅडेट्स नेमके काय स्पेशल ट्रेनिंग देतात त्याचे गूढ अजून उकलायचे होते.
Saturday, 16 May 2020
पति, पत्नी, और 'वोह' !
डिसेंबर १९८७ मधली गोष्ट आहे. त्यावेळी मी कॅप्टन हुद्यावर होतो आणि मध्य प्रदेशात महू येथील मिलिटरी इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये बी.टेक च्या तिसऱ्या वर्षात शिकत होतो. १९८६मध्ये आमचे लग्न झाले तेंव्हा, स्वाती सोलापूरला पोस्टग्रॅज्युएशन करत होती. १९८७च्या जून-जुलैपासून ती महूला माझ्यासोबत प्रथमच राहायला आली होती. तिला सैन्यातील जीवन तसे अजूनही नवीनच होते. मी हळू-हळू तिला एकेका गोष्टीची, सैन्यातील जीवनशैलीची, शिष्टाचारांची ओळख करून देत होतो.
एका निवांत संध्याकाळी, मी आणि स्वाती, ऑफिसर्स क्लबमध्ये गप्पा मारत बसलो होतो. अचानक एक ऑफिसर आमच्यासमोर येऊन उभा राहिला आणि आम्हाला अभिवादन करत अदबीने म्हणाला,
एका निवांत संध्याकाळी, मी आणि स्वाती, ऑफिसर्स क्लबमध्ये गप्पा मारत बसलो होतो. अचानक एक ऑफिसर आमच्यासमोर येऊन उभा राहिला आणि आम्हाला अभिवादन करत अदबीने म्हणाला,
"Good evening ma'm! Good evening sir! सर, मला ओळखलंत ना ?
Sunday, 3 May 2020
लिव्हर सलामत, तो...
दीड-एक वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'अंधाधुन' या सिनेमाच्या सुरुवातीलाच एक वाक्य पडद्यावर येतं, "Life depends upon the Liver!" प्रथमतः ते वाक्य अगदीच विचित्र वाटलं होतं. पण सिनेमा पाहिल्यानंतर, आणि त्या वाक्याचा संदर्भ लक्षात घेता, फारच मजा वाटली होती. त्या सिनेमावर मी आणि स्वाती चर्चा करीत असताना, स्वाती पटकन चेष्टेनेच म्हणून गेली, "Life depends upon the Liver!" हे वाक्य तुझ्या आयुष्यालाही लागू पडतं, नाही का?" Monday, 27 April 2020
खेल खेल में सनम...
खेळाडू' आणि 'अभ्यासू' असे जर दोन ढोबळ गट केले तर माझी गणती दुसऱ्या गटात होण्याची शक्यता अधिक आहे. सोलापूरला प्राथमिक शाळेत असताना, मित्रांसोबत मधल्या सुटीतले ठराविक खेळ मी खेळायचो. उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी, आम्ही आते-मामे-मावस भावंडे मिळून बैठे खेळ आणि क्वचित फुटबॉलही खेळत असू. माझ्या वडिलांना क्रिकेट आवडत असल्याने तेही आमच्या "गल्ली क्रिकेट" मध्ये सहभागी होत असत. पण एकंदरीत माझा जास्त ओढा वाचनाकडे असे.
सातारच्या सैनिक शाळेत गेल्यावर,
सातारच्या सैनिक शाळेत गेल्यावर,
Friday, 17 April 2020
उन्मळलेल्या वृक्षाचे बळी
'ऑपरेशन ब्लू स्टार'ची कारवाई, खालिस्तानी अतिरेक्यांच्या, आणि त्यांना भरीस घालणाऱ्या पाकिस्तानी यंत्रणेच्या, जिव्हारी बसलेला घाव होता. 'सूड' या मानवी भावनेचं, अव्याहत चालू शकणारं, असं एक चक्र असतं. 'ब्लू स्टार' चा सूड खालिस्तानी अतिरेक्यांनी पुरेपूर उगवला. पण, त्यानंतर घडलेल्या काही घटनांमुळे, आजतागायत चालू असलेल्या या सूडचक्रात काही अतिमहत्वाच्या व्यक्तींसोबतच, कित्येक निरपराध भारतीयांचेही बळी गेले आहेत. त्यांच्यापैकी काहींशी माझा दूरान्वयाने का असेना, पण संबंध आला होता.
१९८४ साली ऑक्टोबरचा संपूर्ण महिना, मी सिक्कीमची राजधानी गंगटोकपासून ३०-३२ कि.मी. दूर, भारत-चीन सीमेजवळ,
१९८४ साली ऑक्टोबरचा संपूर्ण महिना, मी सिक्कीमची राजधानी गंगटोकपासून ३०-३२ कि.मी. दूर, भारत-चीन सीमेजवळ,
Monday, 13 April 2020
ऑपरेशन ब्लू स्टारचे ओरखडे
जून १९८१ ते मे १९८४ या काळात, मी अमृतसरमध्ये माझ्या पहिल्याच पोस्टिंगवर असताना, तेथील एकंदर वातावरणात हळूहळू घडत गेलेले बदल पाहत होतो. पण भारताच्या इतिहासातल्या एका अतिशय गंभीर आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या वळणावर आपण उभे आहोत हेेे त्यावेळी समजणे अवघड होते.
पंजाब प्रांतामध्ये एकंदरीत पोलीस आणि सर्वच प्रकारच्या लष्करी व निमलष्करी दलांना भरपूर मान आहे. विशेषतः भारतीय सेनेच्या अधिकारी व जवानांना मिळणारी जी वागणूक मी पंजाबात अनुभवली,
बांगलादेशीयांची अशीही 'हेरगिरी'!
"आमार शोनार बांगला" अश्या शीर्षकाखाली लिहिलेल्या माझ्या अनुभवात, भारतीय NCC कॅडेट आणि बांगलादेशी छात्रसैनिकांदरम्यान २००४ साली घडलेल्या एका हृदयस्पर्शी प्रसंगाचे वर्णन मी केले आहे. परंतु, त्यापूर्वीही एकदा बांगलादेशीयांशी माझा संपर्क आला होता. ती आठवणदेखील अविस्मरणीय आहे.
डिसेंबर १९९२ ते जून १९९६ अशी जवळजवळ साडेतीन वर्षे, अलाहाबाद SSB मध्ये
Friday, 3 April 2020
Saturday, 28 March 2020
Subscribe to:
Posts (Atom)







