Labels

Wednesday, 24 June 2020

चाय गरम , 'चिनी' कम!

मे-जून २०२० मध्ये भारत-चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घडलेल्या काही घटनांमुळे, पंगाँग-त्सो, दौलत बेग ओल्डी, गलवान खोरे, श्योक नदी, अशी काही नावे अचानकच चर्चेत आली. यांपैकी बहुतेक भागांमध्ये सामान्य पर्यटकांना जायला बंदीच आहे. लडाखमध्ये पर्यटनासाठी गेलेले लोक पंगाँग-त्सो तळे ("थ्री इडियट्स" सिनेमातले) नक्की पाहतात! १९६२च्या युद्धासंबंधी ज्यांनी वाचले-ऐकले असेल अशांना नथू-ला, चुशूल ही नावेदेखील ऐकून माहीत असतील. मी आर्मी ऑफिसर असल्यामुळे, कामानिमित्त आणि पर्यटनानिमित्तही यापैकी काही भागांमध्ये वावरण्याची संधी मला मिळाली होती. तेंव्हाचे दोन-तीन प्रसंग यानिमित्ताने सहजच आठवले.

Saturday, 13 June 2020

'बद्धपरिकर'

संस्कृत भाषेतला एक शब्द कधीतरी ऐकला होता. 'बद्धपरिकर'. सदैव तयार, सज्ज किंवा सिद्ध असण्याच्या अवस्थेसाठी योजलेला बद्धपरिकर हा शब्द सैन्यदलाला एकदम फिट बसतो. कारण, अंगावर पडेल ते काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी सैन्यदलाचे जवान व अधिकारी सदैव सज्ज असतात. आपत्ती निवारण, अतिरेक्यांचा नायनाट, दंगे-धोपे आटोक्यात आणणे, किंवा अगदी बोअरवेलमध्ये पडलेल्या लहान मुलाला वाचविण्याच्या कामीदेखील सैन्यदलाला पाचारण केले जाते, आणि ते-ते काम फत्ते होणारच असा गाढ विश्वास आम जनतेला वाटतो.

Tuesday, 2 June 2020

लाख छुपाओ, छुप ना सकेगा...

आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित सैनिकी प्रशिक्षण संस्थेत, म्हणजेच NDAमध्ये ट्रेनिंग घेणे ही खरोखर एक पर्वणीच होती. 'सुदान ब्लॉक' ही NDAची मुख्य इमारत, एखाद्या राजवाड्यासारखी अतिशय  देखणी वास्तू आहे. स्वच्छ, चकचकीत रस्ते, विस्तीर्ण  परेड ग्राउंड, विविध खेळांची व पीटीची मैदाने, जिम्नेशियम हॉल, पोहण्याचे तलाव, आधुनिक उपकरणांनी युक्त, प्रशस्त 'कॅडेट्स मेस', स्क्वाड्रन्सच्या  रेखीव, दगडी वास्तू, असा डोळ्यांचे पारणे फेडणारा, NDAचा हिरवागार परिसर सात हजार एकर जमिनीवर पसरलेला आहे.

Friday, 29 May 2020

तू यारों का यार है...

सैनिकी ट्रेनिंगसंबंधी एक म्हण आहे,
"The more you sweat in peace, the less you bleed in war!" 

माझ्या परिचयाच्या अनेक सिव्हिलियन्सना असे वाटते की आर्मी ऑफिसर्सचे आयुष्य अगदीच छानछोकीचे, ऐषआरामाचे असते, आणि त्यांच्या ट्रेनिंगच्या तुलनेत जवानांचे ट्रेनिंग अधिक खडतर असते. वस्तुस्थिती नेमकी त्याउलट आहे.

Saturday, 23 May 2020

जितना रगडा, उतना तगडा !

NDAमधील कडक ट्रेनिंगबद्दल स्वातीला कमालीचे कुतूहल होते. अधे-मधे तुटक-तुटक माहितीच कानावर आल्याने तिची उत्सुकता अगदीच शिगेला पोहोचली होती. NDAतले पीटी-ड्रिलचे 'उस्ताद' जे वाक्य नेहमी म्हणायचे, ते तिला मी सांगितले होते "जितना रगडा, उतना तगडा!" ते सगळे उस्ताद आम्हाला चांगलेच रगडायचे, हे तिला ऐकून माहिती झाले होते. पण, सिनियर कॅडेट्स नेमके काय स्पेशल ट्रेनिंग देतात त्याचे गूढ अजून उकलायचे होते.

Saturday, 16 May 2020

पति, पत्नी, और 'वोह' !

डिसेंबर १९८७ मधली गोष्ट आहे. त्यावेळी मी कॅप्टन हुद्यावर होतो आणि मध्य प्रदेशात महू येथील मिलिटरी इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये बी.टेक च्या तिसऱ्या वर्षात शिकत होतो. १९८६मध्ये आमचे लग्न झाले तेंव्हा, स्वाती सोलापूरला पोस्टग्रॅज्युएशन करत होती. १९८७च्या जून-जुलैपासून ती महूला माझ्यासोबत प्रथमच राहायला आली होती. तिला सैन्यातील जीवन तसे अजूनही नवीनच होते. मी हळू-हळू तिला एकेका गोष्टीची, सैन्यातील जीवनशैलीची, शिष्टाचारांची ओळख करून देत होतो. 
एका निवांत संध्याकाळी, मी आणि स्वाती, ऑफिसर्स क्लबमध्ये गप्पा मारत बसलो होतो. अचानक एक ऑफिसर आमच्यासमोर येऊन उभा राहिला आणि आम्हाला अभिवादन करत अदबीने म्हणाला,
"Good evening ma'm! Good evening sir! सर, मला ओळखलंत ना ?

Sunday, 3 May 2020

लिव्हर सलामत, तो...

दीड-एक वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'अंधाधुन' या सिनेमाच्या सुरुवातीलाच एक वाक्य पडद्यावर येतं, "Life depends upon the Liver!"  प्रथमतः ते वाक्य अगदीच विचित्र वाटलं होतं. पण सिनेमा पाहिल्यानंतर, आणि त्या वाक्याचा संदर्भ लक्षात घेता, फारच मजा वाटली होती. त्या सिनेमावर मी आणि स्वाती चर्चा करीत असताना, स्वाती पटकन चेष्टेनेच म्हणून गेली, "Life depends upon the Liver!" हे वाक्य तुझ्या आयुष्यालाही लागू पडतं, नाही का?"

Monday, 27 April 2020

खेल खेल में सनम...

खेळाडू' आणि 'अभ्यासू' असे जर दोन ढोबळ गट केले तर माझी गणती दुसऱ्या गटात होण्याची शक्यता अधिक आहे. सोलापूरला प्राथमिक शाळेत असताना, मित्रांसोबत मधल्या सुटीतले ठराविक खेळ मी खेळायचो. उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी, आम्ही आते-मामे-मावस भावंडे मिळून बैठे खेळ आणि क्वचित फुटबॉलही खेळत असू. माझ्या वडिलांना क्रिकेट आवडत असल्याने तेही आमच्या "गल्ली क्रिकेट" मध्ये सहभागी होत असत. पण एकंदरीत माझा जास्त ओढा वाचनाकडे असे.

सातारच्या सैनिक शाळेत गेल्यावर,

Friday, 17 April 2020

उन्मळलेल्या वृक्षाचे बळी

'ऑपरेशन ब्लू स्टार'ची कारवाई, खालिस्तानी अतिरेक्यांच्या, आणि त्यांना भरीस घालणाऱ्या पाकिस्तानी यंत्रणेच्या, जिव्हारी बसलेला घाव होता. 'सूड' या मानवी भावनेचं, अव्याहत चालू शकणारं, असं एक चक्र असतं. 'ब्लू स्टार' चा सूड खालिस्तानी अतिरेक्यांनी पुरेपूर उगवला. पण, त्यानंतर घडलेल्या काही घटनांमुळे, आजतागायत चालू असलेल्या या सूडचक्रात काही अतिमहत्वाच्या व्यक्तींसोबतच, कित्येक निरपराध भारतीयांचेही बळी गेले आहेत. त्यांच्यापैकी काहींशी माझा दूरान्वयाने का असेना, पण संबंध आला होता.

१९८४ साली ऑक्टोबरचा संपूर्ण महिना, मी सिक्कीमची राजधानी गंगटोकपासून ३०-३२ कि.मी. दूर, भारत-चीन सीमेजवळ,

Monday, 13 April 2020

ऑपरेशन ब्लू स्टारचे ओरखडे

जून १९८१ ते मे १९८४ या काळात, मी अमृतसरमध्ये माझ्या पहिल्याच पोस्टिंगवर असताना, तेथील एकंदर वातावरणात हळूहळू घडत गेलेले बदल पाहत होतो. पण भारताच्या इतिहासातल्या एका अतिशय गंभीर आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या वळणावर आपण उभे आहोत हेेे त्यावेळी समजणे अवघड होते.
   
पंजाब प्रांतामध्ये एकंदरीत पोलीस आणि सर्वच प्रकारच्या लष्करी व निमलष्करी दलांना भरपूर मान आहे. विशेषतः भारतीय सेनेच्या अधिकारी व जवानांना मिळणारी जी वागणूक मी पंजाबात अनुभवली,