Labels

Thursday, 15 April 2021

छुपे रुस्तम !

५८व्या NDA कोर्सच्या 'C' (चार्ली) स्क्वाड्रनमध्ये माझ्यासह अनेक वेगवेगळे 'नमुने' होते. प्रत्येकाची काही ना काही खासियत होती, जी आजही सर्वच कोर्समेट्सच्या लक्षात असेल. आमचा दिवंगत मित्र जोसेफ रेड्डी याच्या आठवणीने जरी  डोळ्याच्या कडा ओलावल्या तरीही, त्याच्या अनेक कोट्या आणि माकडचेष्टा आठवून आजही हसू फुटल्याशिवाय राहवत नाही.

Monday, 12 April 2021

एक था ठकसेन !

एका टिचकीने नारळ किंवा कलिंगड प्रत्येकवेळी बिनचूक जोखता येणे कदाचित शक्य असेल, पण मनुष्यस्वभाव? छे! 

१९७७ ते १९८० या काळात, NDAमध्ये प्रशिक्षणार्थी कॅडेट असताना माझ्याच 'स्क्वाड्रन' मधल्या एका कॅडेटला नीटपणे ओळखण्यात आम्ही सर्व कोर्समेट्स कमी पडलो होतो त्याची गोष्ट सांगण्यासारखी आहे.

Saturday, 16 January 2021

वेळ आली नव्हती... (भाग दुसरा)

१९८३ सालची गोष्ट आहे. मी अमृतसरच्या सिग्नल रेजिमेंट मध्ये पोस्टिंगवर होतो. आमच्या रेजिमेंटची एक तुकडी (ब्रिगेड सिग्नल कंपनी) कायमस्वरूपी सुमारे ८० कि. मी. दूर असलेल्या जालंधर छावणीमध्ये तैनात असे.

Wednesday, 13 January 2021

वेळ आली नव्हती... (भाग पहिला)

सैन्यदलातील नोकरी म्हणजे सतत मृत्यूच्या सावटाखाली जगणे असाच समज पुष्कळ लोकांचा असतो. तो समज काही अंशी खराही आहे. NDA प्रशिक्षणकाळापासूनचे माझे स्वतःचे काही मित्र मी अकाली गमावले आहेत, कोणी युद्धभूमीवर, तर कुणी अतिरेक्यांच्या घातपातात! त्यातला एक तर अगदी सैनिक शाळेत पाचवीपासून माझ्याबरोबर असलेला...

Tuesday, 22 September 2020

'लकीर के फकीर'

'आर्मी' हा शब्द उच्चारताक्षणी, 'शिस्त' हा शब्द मनात येतोच. प्रत्येक काम, नेमून दिलेल्या पद्धतीने, शिस्तीत करणे, ठराविक ढंगाने वागणे-बोलणे, या गोष्टींमुळे सैन्यदलातला माणूस, एखाद्याच्या चाणाक्ष नजरेला बरोबर टिपता येतो. अगदी सेवेतून निवृत्त झाल्यावरदेखील 'जित्याची खोड' काही जात नाही.

Sunday, 16 August 2020

बस, छोरी समझ के ना लडियो...!

"गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल"  हा सिनेमा १२ ऑगस्ट २०२० रोजी प्रदर्शित झाला. एका महिला हवाईदल अधिकाऱ्याचा कारगिल युद्धामधील सहभाग हाच या सिनेमाचा केंद्रबिंदू आहे.

Sunday, 26 July 2020

... फौजी दुनिया में ये पहला कदम!

संरक्षण दलांच्या दहा विभागांत महिलांना पर्मनंट कमिशन देण्यासाठी भारत सरकारने मंजुरी दिल्याची बातमी ऐकताच माझे मन भूतकाळात, २८ वर्षे मागे गेले. १७ जुलै १९९२ रोजी सकाळी साडेसात वाजता, सेनाधिकारी होऊ इच्छिणाऱ्या मुलींच्या पहिल्या बॅचसमोर मी उभा होतो, त्यांचा ग्रुप टेस्टिंग ऑफिसर (GTO) म्हणून!  

दिल्लीच्या डिफेन्स इन्स्टिटयूट ऑफ सायकॉलॉजिकल रिसर्च (DIPR) मध्ये GTO कोर्सची थियरी शिकल्यानंतर बंगलोरच्या SSB मध्ये माझे प्रॅक्टिकल ट्रेनिंग सुरु होते. एक 'गुरु GTO' आणि एक शिष्य अशी आमची जोडी होती. पाच-पाच दिवसांची एक टेस्टिंगची बॅच असायची.

Thursday, 23 July 2020

तितली कहे मैं चली आकाश...

सैन्यदलातील नोकरीचे अनेक मुला-मुलींना आकर्षण असते. शिपाई, नायब सुभेदार किंवा लेफ्टनंट अश्या तीन पदांवर सैन्यदलात दाखल होता येते. प्रत्येक पदासाठी पात्रतेच्या अटी व निवडीचे निकष वेगवेगळे आहेत. तिन्ही पदावरच्या नोकऱ्या सन्माननीय आहेत. परंतु, वयाच्या २१-२२व्या वर्षी जर एखाद्या व्यक्तीला सेनाधिकारी म्हणून दाखल होता आले तर तिच्या आयुष्याचा आलेख वेगळाच होतो आणि खूप उंच जाऊ शकतो हे नक्की. त्याविषयी, योग्य माहिती, योग्य वेळी मिळणे महत्वाचे ठरते. या संदर्भातले काही रोचक प्रसंग मला चांगले आठवतात.

Friday, 17 July 2020

घी देखा लेकिन...

"कारगिल युद्धाच्या वेळी तुम्ही कुठे होता?" या प्रश्नावर, "मी जम्मू-काश्मीरमध्ये होतो" हे उत्तर ऐकताच लोकांना कमालीची उत्सुकता वाटते. आता 'टायगर हिल' किंवा 'तोलोलिंग' येथल्या शौर्याची किंवा हौतात्म्याची 'आँखोदेखी' ऐकायला मिळणार, अश्या आशेने ते माझ्याकडे पाहतात. पण, मी कारगिल-द्रास भागात नव्हे तर जम्मूजवळ अखनूर सेक्टरमध्ये होतो, आणि तिथे प्रत्यक्ष युद्ध झाले नव्हते, हे ऐकल्यावर काही जणांचा इंटरेस्ट थोडा कमी झाल्यासारखा वाटतो. 

कदाचित असे असेल की, युद्धकथा action-packed, रम्य, आणि देशभक्तिच्या भावना जागवणाऱ्या असतात. त्यामानाने, शांतिकाळातले आमचे दैनंदिन जीवन, त्यामधील खाचखळगे, आमची सुखदुःखे, वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर येणाऱ्या अनंत अडचणी,  यामध्ये  'नाट्यमय' असे विशेष काही नसते. आणि म्हणूनच, मला त्याबद्दल सांगणे अधिक आवश्यक वाटते.

Sunday, 12 July 2020

चुशूल ना भूल पाएँगे

जुलै २०२०च्या पहिल्या आठवड्यात, चुशूल येथील भारत-चीन सीमेवर, दोन्ही देशांदरम्यानचा तणाव कमी करण्यासाठी महत्वाच्या वाटाघाटी झाल्या. त्याबद्दलचे वृत्त वाचत असता, काही वर्षांपूर्वी चुशूलमध्ये मला आलेला एक अनुभव आठवला.

सैन्यदलाच्या नोकरीत असताना मी लडाखमध्ये कधीच गेलो नव्हतो. तो प्रदेश पाहायची तीव्र इच्छा, सेवेतून निवृत्त झाल्यानंतर चार वर्षांनी पूर्ण झाली. अमेरिकेतील दोन वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिकत असलेली आमची मुले, असिलता आणि अनिरुद्ध, २०११ च्या ऑगस्ट महिन्यात, सुुट्टीकरिता एकाच वेळी भारतात येणार होती. त्यामुळे, आम्ही व्यवस्थित नियोजन करून लडाखचा दौरा आखला.