आज १३ जून २०२१.
चाळीस वर्षांपूर्वी, याच दिवशी, डेहरादूनच्या इंडियन मिलिटरी अकॅडमीमधील दीक्षांत संचलनानंतर 'अंतिम पग' पार करून एका नव्या आयुष्याला मी सुरुवात केली होती.
आज १३ जून २०२१.
चाळीस वर्षांपूर्वी, याच दिवशी, डेहरादूनच्या इंडियन मिलिटरी अकॅडमीमधील दीक्षांत संचलनानंतर 'अंतिम पग' पार करून एका नव्या आयुष्याला मी सुरुवात केली होती.
५८व्या NDA कोर्सच्या 'C' (चार्ली) स्क्वाड्रनमध्ये माझ्यासह अनेक वेगवेगळे 'नमुने' होते. प्रत्येकाची काही ना काही खासियत होती, जी आजही सर्वच कोर्समेट्सच्या लक्षात असेल. आमचा दिवंगत मित्र जोसेफ रेड्डी याच्या आठवणीने जरी डोळ्याच्या कडा ओलावल्या तरीही, त्याच्या अनेक कोट्या आणि माकडचेष्टा आठवून आजही हसू फुटल्याशिवाय राहवत नाही.
एका टिचकीने नारळ किंवा कलिंगड प्रत्येकवेळी बिनचूक जोखता येणे कदाचित शक्य असेल, पण मनुष्यस्वभाव? छे!
१९७७ ते १९८० या काळात, NDAमध्ये प्रशिक्षणार्थी कॅडेट असताना माझ्याच 'स्क्वाड्रन' मधल्या एका कॅडेटला नीटपणे ओळखण्यात आम्ही सर्व कोर्समेट्स कमी पडलो होतो त्याची गोष्ट सांगण्यासारखी आहे.
सैन्यदलातील नोकरी म्हणजे सतत मृत्यूच्या सावटाखाली जगणे असाच समज पुष्कळ लोकांचा असतो. तो समज काही अंशी खराही आहे. NDA प्रशिक्षणकाळापासूनचे माझे स्वतःचे काही मित्र मी अकाली गमावले आहेत, कोणी युद्धभूमीवर, तर कुणी अतिरेक्यांच्या घातपातात! त्यातला एक तर अगदी सैनिक शाळेत पाचवीपासून माझ्याबरोबर असलेला...
'आर्मी' हा शब्द उच्चारताक्षणी, 'शिस्त' हा शब्द मनात येतोच. प्रत्येक काम, नेमून दिलेल्या पद्धतीने, शिस्तीत करणे, ठराविक ढंगाने वागणे-बोलणे, या गोष्टींमुळे सैन्यदलातला माणूस, एखाद्याच्या चाणाक्ष नजरेला बरोबर टिपता येतो. अगदी सेवेतून निवृत्त झाल्यावरदेखील 'जित्याची खोड' काही जात नाही.